पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] आत्मनिरीक्षण संस्थानांची स्थिति इंग्रजी राज्यापेक्षां कोणत्याही बाबींत जास्त चांगली नाही, इतकें सामान्य विधान करण्यास हरकत नाही. - वर बहुतेक बाबींत कानडा व जपान या देशांचीच तुलना मुख्यत्वें आपण घेण्यासारखी आहे. जपान हा देश आशियांतील असून पुष्कळ बाबींत म्हणजे आचार, विचार, रहाणी वगैरेंत त्याचे हिंदुस्थानाशी साम्य आहे. कानडा हा देश ब्रिटिश साम्राज्यांत असल्यामुळे ब्रिटिश साम्राज्यांत असून सुद्धां काय करता येण्यासारखे आहे याचा नमुना म्हणून तो आपणांस उपयोगी आहे. तात्पर्य, कानडा व जपान या दोन देशांच्या नमुन्यावर आपणास आपली सुधारणा केली पाहिजे. मुख्यतः यावरून हा निष्कर्ष निघतो की, हिंदुस्थान सर्वच बाबतीत जगाच्या मागे आहे. अर्थात् स्वराज्य मिळण्यास सर्वांगीण उन्नति झाली पाहिजे.