पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मनिरीक्षण २६१ ४९५ हिंदुस्थानांत सन १९१७।१८ साली छत्तीस हजार मैल रेलवे चालू होती. यापैकी निम्मे रुंद साट्याची असून निम्मे अनेकविध अरुंद साट्याची होती. इंग्रजी राज्यास सन १९२१ साली रेलवे २४८७० मैल होती व शिवाय संस्थानांची, या सर्व रेलवे परकीय भांडवलावर सरकारने राजकीय धोरणाने बांधविल्या आहेत व यामुळे इतर देशांशी तुलना करतां त्या फारच अपुऱ्या आहेत. किती मैल आगगाड्या दर हजार चौरस मैल क्षेत्रास पडतात हे खालील तुलनात्मक आंकड्यांवरून दिसेल, कोणत्या देशांत किती हिंदुस्थान । ११५, संयुक्त संस्थाने २५३३, आस्ट्रेलिया कानडा ४८२५, गेल्या पंचवीस वर्षांत मोटारी हैं एक व्यापाराचे नवे साधन उत्पन्न होऊन त्याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. या बाबतीत अमेरिकेतील संयुक्त संस्थाने फार पुढे गेली आहेत. थोड्याच वर्षांत विमाने देखील व्यापाराच्या कामी उपयोगांत येतील. इतर सर्व देश या बाबींत खटपट करीत असतां हिंदुस्थान कांहींच हालचाल करतांना दिसत नाही. ___हिंदुस्थानांतून बाहेर देशी सर्व कच्चा माल जातो व परदेशांतून सर्व पक्का माल येतो. या कच्चया मालाचे हिंदुस्थानांतच पक्कया मालांत रूपांतर झाले तर देशाचा किती तरी फायदा होईल. हिंदुस्थानाला कोणत्याहि मालासाठी परदेशाच्या तोंडाकडे पहावे लागेल अशी स्थिति नाही. इतकेंच नव्हे तर कित्येक गोष्टींची पैदास हिंदुस्थानाला घुरून इतर देशांना 'पुरवठा होईल अशी आहे. __ हिंदुस्थानांतील गलबतांचा धंदा तर अगदीच बसत चालला आहे. देशाला इतका समुद्राचा गराडा असून हिंदी गलबतांची माल वाहून नेण्याची शक्ति अवघी १६८७२ टन आहे व हिंदुस्थानाशी होणाऱ्या पापाराची नेआण १९०८ साली १२९ लक्ष टन, १९१३ साली २७३ लक्ष टन व १९१८ साली १०९ लक्ष टन होती. इतर सर्व