पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० भावी हिंदी स्वराज्य [प्र० १६ तर हिंदुस्थानचे शेतीचे उत्पन्न सरासरी पांचशे साठ कोटींचे आहे. इतर देशांचे या उत्पन्नाचे आंकडे खाली दिले आहेत. देशाचें नांव. उत्पन्न कोट पौंड. माणशी उत्पन्न पौड शेती. धंदे. संयुक्त संस्थाने . ४२७ ४०.६ । ४६ जपान कानडा २४.७ | २९.५ ७२.१ विलायती २३.९ आस्ट्रेलिया ७.३ | हिंदुस्थान ३७.५ । १.५ २.५ हिंदुस्थानांतील धंद्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. वरील आंकडे अदमासाने दिले आहेत. ज्याप्रमाणे सरकार शेतीचे आंकडे गोळा करून प्रसिद्ध करते त्याचप्रमाणे धंद्याचे आंकडे गोळा करून प्रसिद्ध केलें पाहिजेत. म्हणजे लोकांचे तिकडे लक्ष लागून त्याबाबद काम करतां येईल व जे केले त्याचा सालोसाल काय परिणाम झाला ही गोष्ट त्यांच्या डोळ्यांत भरेल. हिंदुस्थानच्या आयात निर्गत व्यापाराचा आढावा काढला तर तो सालिना ३०६ कोटीचा, आयात १२४ व निर्गत १८२ कोटींची आहे. एकंदर माणशी उत्पन्नाशी याचे प्रमाण खालीलप्रमाणे बसते व तें तुलनात्मक दिलेले आहे. हिंदुस्थान १.१ आस्ट्रेलिया ३७.२ कानडा ६२.६ संयुक्त संस्थाने १७.० विलायत ४०.० 'जपान व्यापाराचे मुख्य साधन म्हणजे माल वाहून नेणारे रस्ते. हिंदुस्थानांत ठोकळ मानाने दोन लाख मैल रस्ते आहेत. त्यापैकी पंचावन हजार मैल खडीचे रस्ते असून बाकीचे एक लक्ष पंचेचाळीस हजार मैल रस्ते साधे आहेत. हिंदुस्थानचे एकंदर क्षेत्रफळ १८,०२,६५७ चौरस मैल आहे व त्यांत अवघे दोन लाख मैल रस्ते म्हणजे फारच थोडे आहेत. या