पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मनिरीक्षण २६९ २१० ____देशाचे नांव लष्करी खर्च आरमारी खर्च एकूण संयुक्त संस्थाने ३०० २७० मा ५७० विलायत २८०४४० ७२० जपान ७७ आस्ट्रेलिया २५ , २५ कानडा हिंदुस्थान २१० हिंदुस्थान देश परतंत्र, तीन बाजूंनी समुद्रवेष्टित, चवथ्या बाजूला हिमालयासारखी अलंध्य भिंत तरी आरमारी खर्च शून्य व लष्करी खर्च जपानच्या तिप्पट अशी हिंदुस्थानची स्थिति आहे. मागी हिंदुस्थानांत १९१७।१८ साली १९४१० पोष्ट आफिसें होती. देशाचा विस्तार पहातां ही संख्या फारच लहान आहे. पोष्टांतून पोंचविलेल्या जिनसांची संख्या ११४ कोटी किंवा दर माणशी वर्षांकाठी ३.६ इतकी आहे. हीच संख्या आस्ट्रेलियांत १४७, विलायतेंत १२३, संयुक्त संस्थानांत १३६ व जपानांत ३४ होती. तारखात्याने पोंचविलेल्या तारा शंभर माणसांस ६.३ दरसाल पडतात. हीच संख्या विलायतेत १९८, कानडांत १५४, व जपानांत ७३ होती. तारेने बोलण्याची यंत्रे हिंदुस्थानांत नुकतीच सुरू होत आहेत. इतर देशांत दर लक्ष लोकसंख्येमागें ही यंत्रे शिकागोंत १८५ न्यूयार्कमध्ये ११७ मांस्ट्रीलमध्ये ८०, सिड्नेत ४८, लंडनांत ३९, टोकिओत २०, मुंबईत ०.४ व कलकत्त्यांत ०.३ अशी आहेत. या पोष्ट, तार व टेलिफोन यांच्या प्रसारावरून देशाच्या व्यापारी उलाढालींची बरोबर कल्पना होते. जितका व्यापार जास्त तितकी ही साधने जास्त वापरण्यात येत असतात. - देशांतील उत्पन्नाच्या बाबी म्हणजे दोन ( १ ) शेती व (२) धंदे. या धंद्यांत खाणी, मासे मारणे, कारखाने वगैरेंचा समावेश करावयाचा.हिंदुस्थानांत एकंदर साडेसव्वीस कोटी एकरांत लागवड करतात व त्यांपैकी पावणे पांच कोटी एकर बागाईत आहे. कोरडवाहू जमीनीत दर एकरी पंधरा व बागाइतांत दर एकरी पन्नास रुपये उत्पन्न होतात असे म्हटले