पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. १ तात्पर्य ज्याला जगांत सभ्यपणाची वर्तणूक म्हणून म्हणतात त्या गोष्टीचे शिक्षण देणारे संघ पहिल्याने निघून त्याचे पुष्कळ सभासद झाले पाहिजेत. हा नियमितपणा आला म्हणजे अहवाल, हिशोब वगैरे कागद वेळचे वेळी येतील, जमाखर्चात सचोटी दृष्टीस पडेल, मंजुरीशिवाय खर्च होणार नाही व सर्व अनियमितपणाचे लहान प्रकार आपोआप बंद होतील, ज्यांच्यामुळे अनेक संघ बुडून हल्ली देशाचे नांव बद् करीत आहेत असे सर्व प्रकार या अनियमितणाच्या पोटी उत्पन्न होतात. अनियमित माणसाचें सर्वच अनियमित, त्याचे सत्य अनियमित, न्याय अनियमित, प्रेमहि अनियनित, असल्या अनियमित माणसांचे लिहिणे अनियमित, वाचणे अनियमित, गणीत अनियमित, फार काय पण जगणे सुद्धां अनियमित, हिंदी संघाचा तिसरा दोष म्हणजे ते एकमार्गी किंवा गतानुगतिक होतात. संघ निघून थोडे दिवस झाले नाहीत तोच त्यांस काय करावे व व काय करू नये हे सुचत नाही. पायाला बोचणारा खडा बोचत नाहीसा झाला की, संपला संघाचा रोजगार ! संघाचे ध्येय अत्यंत आकुंचित, आकांक्षा फार थोडी, दृष्टी विलक्षण क्षुद्र अशी स्थिती असते. कामाला अद्याप नीटशी सुरवात झाली नाही तोच स्वार्थ बोकाळन गैरवर्तणुकीला प्रारंभ होतो. नियमांत कोठे फट आहे काय हे पाहून त्या फटीवाटें हाती लागेल तें घेऊन पळण्याची बुद्धि पुढाऱ्यांना होते. स्वार्थत्यागाची गोष्टच राहिली पण व्यवस्थित व दूरवर दृष्टि देऊन स्वार्थ साधण्याकडे देखील लक्ष नाहीं ! पावसांत लांकडे भिजली म्हणून घराचे कोरडे वासे काढून जाळणारीच मंडळी फार. संघाच्या स्थापकांनी नेहमी योग्य मनुष्य सांपडतांच त्याच्या ताब्यांत नित्यकर्म देऊन आपण पुढच्या पायऱ्या चढण्यास लागले पाहिजे, ही गोष्ट पुष्कळ स्थापक विसरतात, स्थापकांनी दूरवर विचार करून, कामाच्या पायऱ्या ठरवून एक पायरी होतांच दुसरी व दुसरी संपतांच तिसरी असल्या अनेक पायऱ्यांकडे लक्षच दिलेले नसते. एक पायरी चढतांच ते हुश्श करीत दमून बसतात व संघ झोपी जातो. याचे कारण पुढाऱ्यांत जोमच कमी. पुढारी छांदिष्ट नेमले तर असे होणार नाही. पुढारी म्हटला म्हणजे तो जसजसा उंच चढत जाईल तसतशी त्याची नजर फांकली पाहिजे; त्याऐवजी हल्लीचे पुढारी वर चढले म्हणजे