पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १६ या दोहोंतहि मुद्रणाबद्दल अनेक जुलमी कायदे आहेत व मुद्रणाला लोकमताचा असा फारसा पाठिंबा नाही. मग हिंदुस्थानांत आरमार मुळी नाहींच म्हटले तरी चालेल. हिंदुस्थानाचे समुद्रांत संरक्षण करण्याचे काम विलायती आरमाराकडे सोपविलेले आहे व साम्राज्यांतील इतर घटकांना स्वतंत्र आरमार ठेवण्याची परवानगी -मिळून काही वर्षे झाली तरी हिंदुस्थानांत तसे करण्याचा विचार दिसत नाही. हिंदी आरमाराची आवश्यकता महायुद्धांत 'एमडेन'ने उत्तम सिद्ध केली. NFOR हिंदुस्थानांत ७०,००० इंग्रज, व १,४०,००० हिंदी लष्कर आहे. सैन्यांत हिंदी अधिकारी मुळीच नाहीत. महायुद्धांत इंग्रजांच्या वतीने लढणाऱ्या लष्करांत शेकडा पाऊणशें विलायती, शेकडा बारा वसाहतीचे व शेकडा तेरा हिंदी लष्कर होते. त्यावेळी हिंदुस्थानांतून नवीन सहा लाख सैनिक व चार लाख इतर लोक लष्करांत खुषीने दाखल झाले होते. हिंदुस्थानांतील तेरा लाख लोक लढाईत सामील होते. तरी पण तोफखाना वगैरे आधुनिक शस्त्रास्त्रांत हिंदी लोकांचा मुळींच समावेश केलेला नव्हता. याबाबद लार्ड फ्रेंच यांची खालील वाक्ये लक्षात ठेवण्यासारखी आहेत.WE NEPोनाक “So far as cavalry and infantry are concerned the native regiments might always be trusted to give a good account of themselves but of artillery they know nothing. The instinct of self-preservation in the minds of the British rulers has insisted upon keeping the Artillery-particularly horse, field and garrison artillery-entirely in British hands." हिंदुस्थानच्या लष्कराकडे महायुद्धापूर्वी दरसाल तीस कोटी रुपये खर्च होत असे, तो हल्ली साठ कोटींवर गेला आहे. याबाबद इतर देशांचे महायुद्धापूर्वी सन १९१३।१४ सालचे लक्ष पौंडाचे आंकडे खाली दिले आहेत.