पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मनिरीक्षण २६७ एक मुलगा व दर पंधरा मुलींत एक मुलगी शाळेत जात आहे. इंग्रजी राज्यांतील शिक्षणखर्च सन १९१६/१७ साली अक्रा कोट रुपये होता तो १९२१ साली १६,७७,३३,००० रुपये झाला. म्हणजे दर माणशी आठ आणे होता. हाच खर्च इतर देशांत म्हणजे विलायतेत ३८ रुपये, कानडांत १०४ रुपये, जपानांत १३ रुपये व संयुक्त संस्थानांत ११४ रूपये होता. इतर देशांतील महागाई वगैरेंचा विचार केला तरी हिंदुस्थानांत शिक्षणाकडे खर्च अत्यंत थोडा होतो हे उघड आहे. धंदेशिक्षणाचा विचार केला तर सन १९१६।१७ साली चोवीस कोट लोकांत अवधे सोळा हजार लोक धंदेशिक्षण घेत होते व त्यांत एक हि मुलगी नव्हती. हिंदुस्थानांतील बहुतेक धंदेवाईक लोक घरीच आईबापांपाशी व काम करतां करतां कसें तरी ज्ञान संपादन केलेले असतात व त्यामुळे त्या धंद्याचे शास्त्र, त्या धंद्याची यंत्रे, त्या धंद्याच्या नव्या योजना व झालेल्या सुधारणा यांची माहिती या लोकांना नसते. वंशपरंपरागत आलेल्या माहितीत या गोष्टींची भर घातल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. याबाबद लोकांनी किंवा सरकारांनी जनतेला शिक्षण देण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही असें दुःखाने म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. ___ सन १९१७।१८ साली हिंदुस्थानांत ३९७८ वर्तमानपत्रे व मासिकें होती. याच नियतकालिकांची संख्या संयुक्त संस्थानांत २२५ विलायतेत १९० जपानांत ५० व हिंदुस्थानांत बारा या प्रमाणांत पडते. संयुक्त संस्थानासारख्या स्वतंत्र देशांत छापखान्यांची हालचाल फार मोठी असते. सन १९१४ साली संयुक्त संस्थानांत वीस कोटी नियतकालिके होती, नऊ कोटी लोकसंख्येत वीस कोटी नियतकालिके व हिंदुस्थानांत चोवीस कोटींत चार हजार नियतकालिके म्हणजे किती अंतर ! संयुक्त संस्थानांत चोवीस पानांची कित्येक दैनिके व त्यांचे रविवारचे अंक शंभर पानांचे अशी स्थिति आहे. छापखाने व नियतकालिके हे शिक्षणाचे एक मोठे साधन आहे. संयुक्त संस्थानांतील कित्येक नियतकालिके तर लांचलुचपत, दुर्व्यसनें ढोंगे वगैरे दुराचारांच्या बंदोबस्तालाच वाहिलेली आहेत. हिंदुस्थानांतील छापखान्यांची स्थिति फार वाईट आहे. देशी संस्थाने व इंग्रजी राज्य ____भा...हिं...स्व...१७