पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १६ हिंदुस्थानांत दरसाल दर हजारी ३१.८ माणसे मरतात. हीच मृत्युसंख्या जपानांत २१.९ कानडांत १५.१२, विलायतेत १४.६ अमेकेतलि संयुक्त संस्थानांत १४.७, व आस्ट्रेलियांत १०.५ आहे. पाश्चात्य देशांतील माणसांचे सरासरी आयुर्मान ४५ ते ५५ आहे. पण तेच आयुर्मान हिंदुस्थानांत फक्त २३ आहे. हिंदुस्थानाची हवा कांहीं इतकी वाईट नाही की, तीमुळे आयुष्य इतके कमी असावे व मृत्युसंख्या मोठी असावी. या दोहोंचे कारण हिंदी प्रजेची उपासमारच होय याबाबद कोणाचाहि मतभेद नाही. जितकी मृत्युसंख्या जास्त तितकी जननाची संख्या जास्त हा नियम सृष्टीत झाडे, जनावरे वगैरे सगळ्यांत दिसतो, हिंदुस्थानांत दर साल दर दहा लक्षांस ३८.२, जपानांत ३४.२, संयुक्त संस्थानांत ३१.३ कानडांत २७.८, आस्ट्रेलियांत २७.७ व विलायतेत २१.१ याप्रमाणे माणसे मरतात, या जन्म व मरण या दोहोंची वजाबाकी केली म्हणजे कोठे लोकसंख्या किती वाढत आहे हे समजेल, हे आंकडे पुढीलप्रमाणे येतात. हिंदुस्थान ६.४ मृत्यु जास्त व जपान १२.३ कानडा १२.७, संयुक्त संस्थाने १७.३ व आस्ट्रेलियां १७.२ यांत जन्म जास्त अशी स्थिति आहे. हिंदुस्थानांतील साडेएकतीस कोटी लोकांपैकी एक कोटी एकूण सत्तर लाख पुरुष व सोळा लाख स्त्रिया इतकीच माणसें साक्षर आहेत. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे सतरा माणसांत एक माणूस लिहूं वाचं शकतो. दहा बारा वर्षांपूर्वी हिंदुस्थानांत शेकडा पांच माणसें साक्षर होती. हे साक्षरतेचे प्रमाण इतरत्र जपानांत शेकडा ९५, विलायतेत शेकडा ९४, संयुक्त संस्थानांत शेकडा ९०, असें आहे. हिंदुस्थानांतील इंग्रजी राज्यांत १६५९३४५ शाळा आहेत व त्या शाळांत ५१,१७,२१९ मुलगे व १२,१०,७५४मुली शिकावयाला जातात. याशिवाय ६०,२०,३४ मुले खाजगी शाळांत शिकतात. तात्पर्य, हिंदुस्थानांत १७१७ किंवा दोन हजार माणसांचे वस्तीस एक शाळा पडते. इतर देशांतून शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या लोकसंख्येच्या एकपचमांश किंवा षष्ठाश असते. आपण एक षष्ठांशच घेतली तर हिंदुस्थानांत दोन कोट मुलगे व दोन कोट मुली शाळेत जावयाला पाहिजेत. पण प्रत्यक्ष पाहिले तर दर तीन मुलांत