पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

4.] आत्मनिरीक्षण २५५ जधी कांहीं थोडे हरिकवि असे शब्द शिकलो। तधीं मी सर्वज्ञ द्विपसम मदें याचि भरलों॥ माला जधीं कांहीं नेणे म्हणुनि वदले पंडित मला। तधी माझा गर्वज्वर सकळही तो उतरला ॥ वामन पंडित ज्या वेळेला मी जगाशी माझी तुलना केली, जेव्हां पंडितांनी, 'मला कांहीं यावे तितकें येत नाही' असे ठरविले, तेव्हा माझा अभिमान गेला आणि मग खूब प्रयत्न करून मला पंडितत्व मिळाले. खरी सुधारणा व्हावयाला याच रस्त्याने जावे लागते. देशाटन, पंडितमैत्री व सभेत जाणे ‘याने माहिती, तुलना, निर्णय व सुधारणा या चार पायऱ्यांनी मोठेपणा येत असतो व हाच मार्ग आपण स्वीकारावा, देशोदेशींची जी माहिती प्रसिद्ध होते त्या माहितीकडे सहज नजर टाकली तरी आपण भांबावून जातो, इतकी तफावत आपणास हिंदुस्थानच्या बाबतीत दिसून येते. हिंदुस्थानचे क्षेत्रपळ इंग्रजी राज्याचे १०,९७,९०१ चौरस मैल व देशी संस्थानाचे ६,७५,२६७ चौरस मैल मिळन १७,७३,१६८ चौरस मैल आहे व लोकसंख्या सन १९२१ साली २४,७१,३८,३९६ इंग्रजी राज्याची व ७,१९,३६,७२६ देशी संस्थानांची मिळून ३१,९०,७५,१३२ होती. सगळ्या हिंदुस्थानांत सरासरी दर चौरस मैलाला १८० माणसे आहेत, इंग्रजी राज्यांत २२५ व देशी संस्थानांत १०७ याप्रमाणे त्यांचे प्रमाण आहे. ही वस्ती फार दाट आहे असे म्हणता येणार नाही. कारण विलायतेत वस्ती चौरस मैली ३७४ व जपानांत ३५६ आहे. हिंदुस्थानच्या काही भागांत वस्ती दाट आहे. मद्रासेंतील काही भागांत ती दर चारैस मैली १४८८, बंगाल्यांत ११६३, बहार व संयुक्तप्रांत यांत ८८२ अशी आहे, पण हे भाग अपवादात्मक होत. लोकसंख्येची अशी स्थिति असून सुद्धा जर एका हंगामांत पाऊस नीट पडला नाही तर हिंदुस्थानांत हाहाकार उडतो, याचे कारण येथील तीनचतुथोश प्रजा निव्वळ शेतीवर अवलंबून आहे. लागवडी योग्य अशी बहुतेक जमीन लागवडींत येऊन बरीच वर्षे झाली आहेत, व लोकांना उपजीविकेचे दुसरे साधन नाही.