पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण सोळावें ESIS आत्मानिरीक्षण ....... हिंदुस्थानास स्वराज्य मिळावे असे म्हणतांना स्वराज्य म्हणजे काय मिळावयाचे असा प्रश्न साहजीक येतो; यासाठी हिंहुस्थान व इतर स्वतंत्र देश यांत तफावत काय आहे हे पहावे लागते. हिंदुस्थान व इतर स्वतंत्र देश यांत अमुक तफावत आहे असे ठरविल्यावर दुसरा प्रश्न अशी तफावत कां पडते हे पहाणे होय, व मग ही तफावत घालविण्यासाठी अमुक करावे व हे करणे म्हणजे स्वराज्य मिळवणे असे आपणांस म्हणतां येते. इतर राष्ट्रांच्या बरोबरीचे, त्यांनी आपणांस मान द्यावा असे, आपण झाल्याशिवाय आपल्याला स्वराज्य, योग्य स्वराज्य, मिळाले असे होणार नाही. हिंदुस्थानची हल्लींची व पूर्वीची तुलना करून काम भागत नाही. तर हिंदुस्थानची हल्लींची स्थिति व हतर देशांची ज्यांना आपण प्रमुख देश म्हणतों अशा देशांची स्थिति यांची तुलना करून ती स्थिति प्राप्त करून घेणे म्हणजे स्वराज्य मिळविणे होय. समर्थानी असेच सांगितले आहे. स्वराज्य सुराज्य असावें । इतर राष्ट्र त्यास मानावे । सर्वतोपरी उन्नत व्हावें । या नांव देशहित ॥ दासबोध. अशा त-हेची आपण तुलना करू लागलों म्हणजे आपणाला वाईट वाटेल, आपण तुच्छ, हनि आहोत असे आपणांस वाटेल, पण त्यास इलाज नाही. आपले कल्याण व्हावे म्हणून अशी तुलना करणे, आपल्या अभिमानाला धक्का बसेल असे करणे अवश्य आहे, जगांत काय स्थिति आहे हे पाहून अभिमान गळल्याशिवाय योग्य सुधारणा होत नाहीं. वामन पंडितांनी आपला स्वतःचा विद्वत्तेसंबंधांत असाच अनुभव सांगितला आहे.