पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माणसंपादन खंड उपोद्घात या संपादन खंडांत येत्या तीन चार वर्षांत जे हक्क आपण संपादन केले पाहिजेत त्यांचा विचार केला आहे. हे हक्क कसे संपादन करावे हे ज्याचे त्याने ठरवून त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा पद्धतीने संपादन करावे. मतदार लोक आपले पुढारी किंवा नायक सरकारांत पाठवितात. या नायकांनी आपल्या मुदतींत काय संपादन करावे अशी मतदारांची अपेक्षा आहे हे त्यांस निरोप देते वेळी सांगण्याचा मतदारांस हक्क पोंचतो, सेनापति युद्धावर जाऊ लागला म्हणजे त्याला निरोप देतांना असाच प्रकार करण्यांत येतो. श्रीमती जिजाबाईसाहेब यांनी तानाजीस निरोप देतांना सिंहगड तीन दिवसांत हस्तगत झाला पाहिजे म्हणून सांगितले होते. जपानी बादशहा मिकाडो यांनी जनरल नोगीला तर नुसता पोर्ट आर्थर किल्ला घ्यावा इतकाच निरोप सांगितला होता. त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शक्य त्या उपायांनी काय संपादन करावे इतकेंच आपण सांगावयाचे आहे. Everything is fair in love and war' या इंग्रजी म्हणीप्रमाणे हे संपादन करण्यांत त्यांना ज्या वेळी जे योग्य वाटेल ते त्यांनी करावें. यांपैकी जेवढे व जशा प्रकारें संपादन होईल हैं पाहिल्यावर पुढील निवडणुकीच्या वेळी पुढचा विचार करता येईल. आपणांस किती काम करावयाचे आहे याचा काही तरी आडाखा डोळ्यापुढे असावा म्हणूनच पुढील पानांतील माहिती दिली आहे. इतकें काम झाले तर आपली निवड योग्य झाली व त्या माणसाने आपले काम चोख केले असे म्हणता येईल. इतकें सुद्धा होईल का ? अशी शंका कित्येक घेतील व जितके मिळविता येईल तितके मिळवावयाचे हे तिचे समाधान होय. सर्व सत्ता आपल्या ढुंगणाखाली घालून बसलेल्या नोकरशाहीच्या हातून ती सत्ता काढून आपल्या स्वाधीन ठेवणे हे एक मोठे युद्ध आहे