पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० भावी हिंदी स्वराज्य [प्र० १५ होईल तो जिंकीत असतो. अर्थात् तुटपुंज्या शक्तीचा पराजय ठरलेला आहे, हिंदुस्थानांत थोड्याशा इंग्रजांचे राज्य नसून हिंदी लोकांच्या एकत्र बेरीज केलेल्या शक्तीपेक्षा जास्त भरत असलेल्या त्यांच्या शक्तीचे राज्य आहे. हजारों दिशांकडे ओढ घेणारी आपली शक्ति आपण एकमुखी केली तर हिंदी लोकांची शक्ति विजयी होईल. हीच गोष्ट आपण मुख्यत्वे लक्षात ठेवून वागले पाहिजे. संघस्थापनेने मोठमोठी कामें शेवटास जातात ती या एकाग्रतेमुळे व ती साधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे सगळ्या गोष्टींचे सार आहे. वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करतांना आपणास दोन गोष्टी नीट ध्यानात ठेवल्या पाहिजेत, त्या अशा १ वर ज्या सुधारणा किंवा जगाची जी प्रगति म्हणून सांगितली ती. अवघी शंभर वर्षातील आहे, सन १८२४ साली इंग्लंद, यूरोप किंवा अमेरिका यांची स्थिति हिंदुस्थानापेक्षा कोणत्याहि प्रकारे श्रेष्ठ नव्हती. त्यावेळी शर्यतींत आपण जगाच्या बरोबर होतो. त्यानंतर आपणाला एका झाडाला बांधून टाकल्यामुळे आपण जगाबरोबर पळं शकलो नाहीं व अशा कारणानेच आपण मागे पडलो आहोत. आपण जर मोकळे असतों तर आपण सर्व बाबींत जगाची बरोबरी करून दाखविली असती याबाबद आपणांस संशय नाही व हीच गोष्ट आजच्या खालावलेल्या स्थितीतसुद्धा आपली बंधने दिली झाली तर प्रत्यक्ष करून दाखवू अशी आपणांस उमेद धरण्यास जागा आहे. ___२ ही झालेली प्रगति इतकी थोडी आहे की, अवघ्या पंचवीस वर्षांत जपाननें हिची छाननी करून हिच्यांतील सार ग्रहण केले व इतर जगाच्या बरोबरीचे आपण या बाबतींत झालों ही गोष्ट पुढे असणाऱ्या राष्ट्रांना पटवून दिली, जी गोष्ट जपानने करून दाखविली तीच आपण करून दाखवू असें तुर्कस्थान, चीन वगैरे राष्ट्र म्हणत आहेत व तेच म्हणणे हिंदुस्थानाचे आहे. - तात्पर्य, वर दाखविलेल्या जगाच्या व आपल्या स्थितींतील अंतरामुळे आपण खट्टू किंवा नाउमेद होण्याचे बिलकुल कारण नाही व अशी