पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानपद संस्था २४९ जेव्हां वाणी, कारागीर वगैरे लोक जूट करून एखादें काम करूं म्हणतात त्याला संभूयसमुत्थान (उक्ता ठराव ) म्हणावे व हा पण न्यायाच्या निवाड्यासाठी येत असतो. ज्यावेळी पुष्कळ लोकांतर्फे एक माणूस पैसे देत अगर घेत असतो व ठरलेलें काम करून देत अगर घेत असतो तेव्हां ते काम त्या सगळ्यांनी एकत्र मिळन केले असें समजावें, काम करणाऱ्या जमावांत कांहीं शिकणारे, काही उमेदवार, कांही जाणते व कांहीं कामांत कुशल (प्रवीण) असे लागतात. मिळालेली मिळकत या लोकांनी एक, दोन, तीन व चार या प्रमाणांत वाढून घ्यावी. इतक्या प्रकारचे लोक नसले व घर, देऊळ, भांडी, उपकरणी वगैरे कामें अनेकांनी जुटीनी मिळून केली तर मिळकतीचे तीन भाग करून प्रमुख मंडळींनी दोन भाग व इतरांनी एक भाग अशी वाटणी करावी. गाणाऱ्या लोकांत अशीच वाटणी करतात. ठेका व सूर (तबला व पेटी वाजविणारे) यांना निम्मा हिस्सा व निम्या हिश्यांत सर्व गाणारे यांचा सारखा भाग अशी वांटणी सवसमत आहे. ____ तात्पर्य, हल्लीच्या सुधारलेल्या व भरभराटीत असलेल्या देशांत ज्या संस्था व जे नियम आहेत ते सर्व एका काळी आपल्या देशांत होते व ऊर्जितावस्थेत असलेल्या सर्व देशांत हीच स्थिति असते. आपला देश ऊर्जित दशेस यावा असे वाटत असल्यास आपण संघ स्थापून व्यापार, उदीम, शेती, कारागिरी, कारखाने वगैरे चालविले पाहिजेत. या संघस्थापनेला सत्य हे अवश्य आहे. सत्य हे उघड, एकजिनसी व सीना समजणारे असल्याने तेंव्यवहारास फार सोईचे पडते. असत्याचे हजारों प्रकार असल्यामुळे मोठ्या शहाण्या माणसास देखील त्यांतील रहस्य अगर खरा प्रकार ओळखणे मुष्कील होते व त्यामुळे एकमेकांना एकमेकांचा विश्वास न वाटून व्यवहाराला अडचण होते. व्यवहाराला अडचण याचाच अर्थ समाजाची कुचंबणा व यापासून शक्ति वायां जाऊन समाजाचे नुकसान ही गोष्ट ठरलेली आहे. खरा प्रकार शोधून काढणे या एका गोष्टींतच समाजघटकांचे पुष्कळ सामर्थ्य खर्ची पडले म्हणजे समाजाचे हित करण्याला लागणाऱ्या शक्तीचा तुटवडा पडतो व अशा तुटपुंज्या शक्तीने काय काम होणार ? जगांत आपला प्रयत्न व लोकांचा प्रयत्न यांची टक्कर असून ज्याची सरशी