पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१५ मेंढपाळाने ९० मेंढ्या राजाकडून घेतल्या व नंदादीपास तूप पुरविण्याचे कबूल केले, त्या बाबदच्या शिलालेखांत आहेत. या शिलालेखांत त्या धनगरांच्या जातीने (पशुपाल श्रेणी) इरणसत्तनाला आपण जामीन असल्याचे कबूल केले आहे. विक्रम चोल राजाच्या शिलालेखांत 'कुसीद श्रेणी' सावकाराच्या सभेच्या उल्लेख आहे. 'वणिक् श्रेणि' व्यापाऱ्यांचा तांडा याचा उल्लेख जातक कथांत आहे. स्कंद गुप्तराजाच्या वेळी इंद्रपूरच्या तेल्यांनी जो करार केला आहे त्यांत तेल्यांच्या श्रेणीचा उल्लेख आहे. कुमारगुप्ताच्या वेळी दशापूरच्या गुजराथी कोष्टयांनी रोशिमाचे कारखाने काढण्याबद्दल मिळविलेल्या परवान्यांत 'कारू श्रेणी' चा उल्लेख आहे. गुजराथेंत गांधिक श्रेणि (वाणसवद्याचा व्यापार करणारांचा जमाव ), धान्यक श्रेणी ( भुसान्यांचा जमाव ) यांचे उल्लेख सांपडतात, नाशकाजवळील गोवर्धनच्या शिलालेखांत ओदयांत्रिक Hydraulic Engineers (बंधारे बांधून पाणी पुरविणारे ), कुंभकार (मडकी व विटा अगर घागरी करणारे) यांच्या श्रेणींचा उल्लेख आहे व या मंडळ्या उषवदात याने दिलेल्या देणगीच्या दवाखान्यासाठी जामीन व व्यवस्थापक होत्या. या दवाखान्याची व्यवस्था 'निगमसभे' कडे होती. या संबंधांचे नियम काय होते हे आपण आतां पाहूं. या श्रेणींचे स्वतंत्र निराळे ध्वज असत व त्यांत ज्येष्ठ (वडील माणसें) Vice President व श्रेष्ठ ( सर्वात मुख्य माणसें) President असे भेद असून या लोकांना जास्त मान होता. वणिक्प्रभृतयो यत्र कर्म संभूय कुर्वते ॥ तत्संभूयसमुत्थानं व्यवहारपदं भवेद् ॥ नारद अ०३ बहूनां संमतो यस्तु दद्यादेको धनं नरः॥ करणं कारयेद्वापि सर्वैरेतत्कृतं भवेत् ॥ बृहस्पति अ० १७ शिष्यकाभिज्ञकुशला आचार्याश्चेति शिल्पिनः॥ एकाद्वित्रिचतुर्भागान् हरेयुस्ते यथोत्तरं । कात्यायन हर्म्य देवगृहं वापि धार्मिकोपस्कराणि च ॥ संभूयकुर्वतां तेषां प्रमुखो मंशमर्हति ॥ बृहस्पति अ०८ नर्तकानां एष एव धर्मः सद्भिरुदाहृतः॥ तालज्ञोलभतेऽध्यधौगायकास्तुसमांशिनः॥ बृहस्पति अ०८