पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] जानपद संस्था २४७ प्रसिद्ध अगर मान्य केला तो या विषयाचा संहिता ग्रंथ होय व ज्या पंथाचा तो ग्रंथ त्या पंथाची ती संहिता असे म्हणतात. कश्यपसंहि I, भृगुसंहिता वगैरे ज्योतिष, शिल्प वगैरे विषयांवर जे निरनिराळे ग्रंथ आहेत ते त्या त्या पंथांच्या विद्वानांनी याप्रमाणे एकत्र केलेल्या ज्ञानाचे सांठे होत असे वाटते. मामा पुढे बौद्ध धर्मात तर विहारांत संघांची व्यवस्था ठेवण्याबद्दलचे गौतमबुद्धाचे नियम स्पष्ट प्रातिधेिनिक स्वरूपाचेच आहेत. या संघांत समयाला ( Constitution ) विनय ( Mission ) शुभेच्छा असें नांव आहे. या विहारांत समानता, ज्येष्ठय व ऐक्य यांचे सुंदर एकीकरण आहे, प्रत्येक इसमास एक मत असल्याने सगळे समान होते ( तेथें जातिभेद वगैरे तर नव्हताच ); पण अधिक ज्ञानी माणसाला जास्त मान असल्याने वडीलधाकटेपण होते; व सर्वांना मान्य झाल्यावांचून कोणतीहि गोष्ट अमलांत येत नसल्यामुळे एकी होती. या विहारांत मते घेण्याच्या तीन त-हा होत्या (१) गुप्त, (२) संयत व (३) प्रगट, गुप्त पद्धतींत शलाका ग्राहकापाशी (Polling officer) प्रत्येकाने येऊन होय किंवा नाही दर्शविणाऱ्या दोन काड्यांपैकी एक काडी द्यावयाची व ती कोणास दाखवावयाची नाही अशी रीत होती. ज्या जातीच्या जितक्या काड्या खपल्या त्या जातीची तितकी मते पडली असे समजत, यामुळे कोणी काय मत दिले हे समजत नसे. संयत पद्धतींत प्रत्येकास निरनिराळ्या रंगाच्या दोन काड्या देत व त्यांपैकी एक काडी शलाकाग्राहकाजवळ द्यावयाची व ज्या बाजूला जितक्या काड्या जमल्या त्या अंगास तितकी मते पडली असे समजत. प्रगट पद्धतींत एका मताच्या लोकांनी एका अंगास व दुसऱ्या मताच्या लोकांनी दुसऱ्या अंगास गोळा व्हावयाचे असे. या मते घेण्यांत 'अनुमतिकल्प ' म्हणून एक पद्धति असे. तीत हजर असलेल्या लोकांनी " आम्ही हजर नसलेल्यांची मने वळवून त्यांस अमुक बाजूस मते द्यावयास लावू " असे सांगावयाचे असे. पण ही पद्धत घातक असें दिसल्यावरून ती पुढे बंद करण्यांत आली. एक धंदा करणारांच्या जमावांना श्रेणि म्हणत म्हणून वर सांगितलेंच, अशा श्रेणींचा उल्लेख राजेंद्र चोल राजाच्या वेळी इरणसत्तन नांवाच्या