पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १५ वरून व प्रसिद्ध चिनी प्रवासी फाहीन याने त्यावेळचे सरदार व श्रीमंत लोक यांच्या देणग्यांनी स्थापलेल्या व नीट चाललेल्या अनेक ठिकाणच्य । दवाखान्यांच्या वर्णनावरून उघड होते. हे समूह नालंद, तक्षशिला येथील सारख्या मोठमोठ्या शाळा चालवीत असत. चिनी प्रवासी इत्संग याने नालंद येथील शाळेचें में सुंदर वर्णन केले आहे त्यावरून त्या शाळेत आठ मोठे दिवाणखाने (लेक्चर हॉल) व शंभर खोल्या (वर्ग) असून त्यांत पांच हजार विद्यार्थी होते असे समजते. हे विद्यार्थी त्या ठिकाणी जेवून खाऊन फुकट शिकत असत व त्यांचा खर्च चालण्यासाठी या विद्यालयाला दोनशे गांवे इनाम होती. चिनी प्रवासी हुएन संग याने या शाळेचे वर्णन करतांना ढगांच्या वर जाणाऱ्या तेथील वेधशाळा व मनोरे यांचे व सुंदर इमारतीचे मनोवेधक चित्र रेखाटले आहे. तक्षशिला येथें तर ग्रीस, रोम वगैरे देशांतून विद्यार्थी शिकण्यास येत व एका काळी वीरदेव नांवाचा परदेशी विद्वान् येथे मुख्य 'सद सस्पति' होता असे वर्णन आहे. सरस्वती काठच्या तक्षशिला येथील शाळेच्या बऱ्याच गोष्टी ' जातक कथांत' सांगितल्या आहेत, व सरस्वती म्हणजे विद्या असा जो अर्थ हल्ली रूढ आहे तो हे तक्षशिला नगर व तेथील नदी यांच्या सानिध्यानेच आला आहे. उत्तर हिंदुस्थानांत मात्र अशा सभा व त्यांचे मोठे दवाखाने, शाळा वगैरे होत्या असे नसून त्या काळी म्हणजे खिस्त पूर्वी ५०० च्या सुमारे सगळ्या हिंदुस्थानांत अशा संस्था होत्या हे (१) आंध्र सेनापती उषवदात बाने नाशीक जवळील गोवर्धन गांवच्या 'निगम सभेला' दवाखाना चालविण्यासाठी दिलेल्या देणगीच्या शिलालेखावरून व (२) पांड्य राजा उग्रपेरुवल्लुधि याने एकुणपन्नास कवि सभासद असलेल्या साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीवरून स्पष्ट सिद्ध होते. या पांड्य राजाने 'कुरलग्रंथ' नांवाच्या ग्रंथास मोठे बक्षीस दिले होते. कुंभ मेळ्यांसारखे मेळे भरण्याची जी आपली चाल आहे ती या असल्या साहित्य परिषदांवरूनच पडलेली दिसते व ग्रंथकर्त्यांची नांवें न घालतां जे अनेक संहिताग्रंथ आपल्या देशांत मिळतात ते अशा विद्वत्सभांनी एकत्र जमून प्रसिद्ध केल्यामुळेच होत, एका विषयाचा व्यासंग करणाऱ्या अनेक विद्वानांच्या सभेने जो ग्रंथ