पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानपद संस्था २४६ समूहाच्या कामासाठी गेलेल्या लोकांना जे काही मिळेल ते त्यांनी समूहाच्या खजिन्यांत भरावें. जो कोणी असें न करील त्याच्याकडून अक्रापट किंमत भरून घ्यावी. जो समूहाचे संविद (Clear understanding) मोडील व त्याचे द्रव्य खाईल त्याचे सर्व उत्पन्न जप्त करून राजाने त्याला हद्दपार करावें. ऋग्वेदांत 'पणी' नांवाच्या लोकांना याप्रमाणे हद्दपार केल्याची कथा आहे. दक्षिण हिंदुस्थान किंवा दंडक अरण्य ही अशा हद्दपार केलेल्या लोकांची राहण्याची जागा होती. समूहाचे काम उत्तम रीतीने फत्ते करून आलेल्यांना व त्या कामी खर्ची पडलेल्या लोकांना राजाने देणग्या, पदव्या, इनामें वगैरेंनी भूषित करावे. याप्रमाणे परदेशी जाऊन जुटीने व्यापार, शेती, लढाई वगैरे करून यश संपादन करणारांचा जोपर्यंत ( बोलबाला ) सत्कार होत असे तोपर्यंत हिंदुस्थानांतून परदेशी जाऊन नांव मिळविण्यासाठी लोक उत्सुक असत व अशा लोकांना राजांकडून प्रोत्साहन व मदत मिळे. अशा लोकांना राजाने घरें व भूमि ( जमीनी) अगर घरे बांधण्यालायक जमीनी सारा वगैरे माफ करून द्याव्या ( जमीन इनाम द्यावी) व राजाने आपले आज्ञापत्र काढून व त्यांत यांचे नांव व (मुक्तभाव्य ) यांनी केलेल्या स्वार्थत्यागाच्या गोष्टी यांची नोंद करून ती सनद इनामाबरोबर द्यावी, असें बृहस्पतींचे म्हणणे आहे, तात्पर्य, कोणाहि ( कास्टिट्यूशनल) नियम करून संघटित केलेल्या मंडळाला समूह ( सम्-योग्य रीतीने, ऊह-नांव ठेवलेला जमाव ) असे म्हणतात. असा ब्राह्मणांचा समाज असला म्हणजे त्याला सभा किंवा परिषद् म्हणत, क्षत्रियांचा असला म्हणजे गण म्हणत, वैश्यांचा असला म्हणजे श्रेणि म्हणत, कारागिरांचा असला म्हणजे त्याला वर्ग म्हणत व त्रैवर्णिकांचा किंवा मिसळ असला म्हणजे त्याला संघ किंवा समिति म्हणत. अशा प्रकारचे समूह अस्तित्वांत असून चांगले भरभराटीत होते हैं महाभारत शांतिपर्व अध्याय ५७ श्लोक ३१,३२ वरून व या गणांची जी नाणी वगैरे अवशेष सांपडतात त्यांवरून सिद्ध होते. ___ असे समूह, दवाखाने चालविणे वगैरे सामाजिक कामें अंगांवर घेत असत हे अशोकाच्या स्तंभावर कोरलेल्या आज्ञापत्र नंबर दोन