पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १६ साठी विधि किंवा निषेधरूपी धमांचे मोठे स्तोम माजविणारा असे तिन्ही प्रकारचे लोक शिक्षा करण्यास योग्य आहेत. करण्यास सांगितलेले काम न केल्याने समाजांत त्या कामापासून उत्पन्न होणाऱ्या गोष्टींची कमतरता पडते. करूं नये असे सांगितलेले काम केल्याने समाजाचे तितकें नुकसान होते व आपणास बरे वाटते म्हणून एकाद्या कामाचे स्तोम (बंड) माजविल्याने त्या कामाची थट्टा होते. व लोकांस वाईट वळण लागते. यासाठी या तिन्ही प्रकारच्या मनःप्रवृत्ति त्या समाजांतून घालविणे जरूर असते व प्रायश्चित्त हे ती प्रवृत्ति घालविण्यांचे साधन आहे. - योग्य नियम करून मंडळ स्थापणे म्हणजे काय याचा असा खुलासा आहे व तो खालील वाक्यांवरून जास्त स्पष्ट होतो. धर्मज्ञाः शुचयो, लुब्धा भवेयुः कार्यचिंतकाः ॥ कर्तव्यं वचनं तेषां समूहहितवादिनां ॥ कर्तव्यं वचनं सर्वैः समूहहितवादिना ॥ यस्तत्र विपरीतः स्यात् स दाप्यः प्रथमंदमं॥ समूहकार्यप्रहितो यल्लभेत तदर्पयेत् ॥ एकादशगुणं दाप्यो यद्यसौ नार्पयेत्स्वयं ॥ गणद्रव्यं हरेद्यस्तु संविदं लंघयेच्च यः॥ सर्वस्वहरणं कृत्वा तं राष्ट्राद्विप्रवासयेत् ॥ समूहकार्य आपातान् कृतकार्यान् विसर्जयेद ॥ सुदानमानसत्कारैः पूजयित्वा महीपतिः॥ याज्ञवल्क्यव्य. अनाच्छद्यकरास्तेभ्यो दातव्या गृहभूमयः॥ मुक्तभाव्याश्च नृपतिलेखयित्वा स्वशासने॥बृहस्पतिअ०१७ कोणत्याहि समूहाचे कार्यचिंतक ( कामाची काळजी वाहणारे हे ) धर्म ( न्यायान्याय ) जाणणारे, शुचि (शुद्ध आचरणाचे ) व अलुब्ध (निर्लोभ, निःस्पृह ) असे असावे. हे त्या समूहाचे कल्याण सांगणारे असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कामे व्हावी. ज्यांना हल्ली डायरेक्टर म्हणतात ते हे कार्यचिंतक होत. जो कोणी मंडळाचा सभासद या निवडक काचिंतकांचे म्हणणे मानणार नाही त्याला पहिल्याने दंड करावा. दम॥