पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानपद संस्था २४३ निर्वाह करणे) या दहापैकी कोणत्याहि प्रकाराने मिळवावे, प्रत्येक व्यक्तीने अगर अनेक व्यक्तींच्या संघाने यांपैकी कोणताहि मार्ग स्वीकारला तर तो धर्म्य ( कायदेशीर ) होय. याशिवाय दुसरा मार्ग हा अधर्म्य होय व या अधर्म्य मार्गाने जाणारेच नव्हेत तर त्यांचे मदतगार, स्नेही हे देखील वाईट समजण्यांत येतात. (१) गणानां चैव याजकः। एतान्विहिताचारान्..विवर्जयेद् ॥ (२) गणान्नं गणिकान्नं च विदुषां तु जुगुप्सितं ॥ मनु अ०३, अ०४ ___ या शब्दांनी मनूने आपल्या स्मृतींत अधर्म्य टोळ्यांचा निषेध केला आहे व यांशी संपर्क ठेवू नये असे सांगितले आहे. ___राजाने कायदे करतांना आपल्या देशांत राहणाऱ्या सर्व लोकांच्या चाली, रीति, आचार, विचार वगैरेंचा विचार करूनच कायदे करावे म्हणजे लोकांना त्याप्रमाणे वर्तन ठेवण्यास बरे पडतें असें मनूने सांगितले आहे. जातिजानपदान् धर्मान् श्रेणिधर्माश्च धर्मविद् ॥ समीक्ष्य कुलधर्माश्च स्वधर्म प्रतिपादयेद् ॥ मनु ८।४१ । जातींच्या चालीरीति, देशांचे आचारविचार, धंदेवाल्यांच्या सोई गैरसोई कुळांच्या वहिवाटी या सर्व गोष्टी नीट रीतीने विचारात घेऊन मग राजाने आपले कायदे करावे, निरनिराळ्या देशांत (प्रातांत) निरनिराळ्या जातींत निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांत व निरनिराळ्या घराण्यांत निरनिराळ्या गोष्टी सोईच्या व गैरेसोईच्या, योग्य किंवा अयोग्य समजत असतात व या व्यवस्था लक्षात घेऊन कायदे केले तर त्यांना मोडण्याचे कारण पडणार नाही. चांगली माणसे हे कायदे मग मोडणार नाहीत. बेशिस्त वागण्याची हौस असणारे लोक इतका विचार करून केलेलेहि कायदे मोडतील तर त्यांस शिक्षा करणे व शिस्त लावणे भाग आहे. अकुर्वन् विहितं कर्म निंदितं च समाचरन् ॥ का प्रसक्तश्चेद्रियार्थेषु प्रायश्चित्ती भवेन्नरः॥ मनु अ० ११४४ प में काम करावे म्हणून विधि सांगितला ते न करणारा, जे काम करूं नये म्हणून निषेध केला ते मुद्दाम करणारा व इंद्रियांची हौस पुरविण्या