पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १५ चालविण्यासाठी) व असल्याच ज्या कोणी जबाबदारी ठरविली नाहीं अशा मंडळ्या अनियम्यांशकर्तृ ( Unlimited Companies ) या सर्वांना खालील नियम लागू आहे. तो असा की, जर हे लोक बाहेर (परदेशी) गेले असतां यांना कोणी अडकविले तर त्यांना सोडविण्यासाठी जो खर्च येईल तो त्या मंडळींनी आपआपसांत वांटून करावा. असल्या अनियम्यांशकर्तृ बेजबाबदार ( Unlimited ) मंडळ्यांना राजाचे संरक्षण मिळणार नाही. संरक्षण पाहिजे असेल तर धर्माला धरून व योग्य असेच करार करून मंडळ स्थापले पाहिजे. - आपली उपजीविका चालविण्यासाठी धन प्रत्येकाला मिळवावे लागते. पण त्या धन मिळविण्याच्या पद्धतींत धर्म्य (समाजांत वापरण्यास लायक) व अधर्म्य (समाजाला विघातक) असे दोन भेद होतात. यांत धर्मसाध. नांचा उपयोग केला तर त्या उपभोग करणारांना राजापासून संरक्षणाचा फायदा मिळतो व तसे नसेल तर मिळत नाही. यासाठी ही धर्म्य साधने कोणती हे सांगितले पाहिजे, सप्तवित्तागमा धा दायो लाभः क्रयो जयः॥ प्रयोगः कर्मयोगश्च सत्प्रतिग्रह एवच ॥ विद्या शिल्पं मृतिः सेवा गोरक्ष्ये विपणिः कृषी॥ धृतिर्भेक्ष्यं कुसीदं च दश जीवनहेतवः॥ मनु-१०-११५।१६ वाडवडिलांपासून वारशाने मिळणे, ठेवलेली ठेव सांपडणें, परदेशांतून जिंकून आणणे, सावकारी करणे, कारागिरी करणे व चांगल्या माणसाने बक्षीस देणे या सात प्रकारांनी द्रव्य मिळविले तर ते धर्म्य होय. या सात द्रव्य मिळविण्याच्या पद्धति समाजाला हितकर आहेत, पोटाला मिळविणे तें विद्या लोकांना शिकविणे), शिल्प (कारागिरी करणे), भृति (निरोप वगैरे पोचवून पोटगी मिळविणे), सेवा (दुसऱ्याचे काम करून पोटास मिळविणे), गोरक्ष्य (गाई, शेळ्या वगैरे संभाळणे), विपणि (बाजारांत बसून जिन्नस विकणे), कृषी (शेती करणे), धृति (भजन, पूजन करीत बसून लोक देतील त्यांत संतुष्ट असणे), भैक्ष्यं (लोकांच्या दारोदार जाऊन मागणे) व कुसीद (लोकांस उसनवार देऊन वाढ वगैरेवर