पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.1 जानपद संस्था २४१ पाखंडनैगमादीनां स्थितिः समय उच्यते ॥ समयस्यानपाकर्म तद्विवादपदं स्मृतं ॥ नारद अ० १० पाखंड, नैगम वगैरे जुटींनी जे आपसांत नियम केलेले असतात त्या नियमांना समय (Constitution ) म्हणतात व हा समय न पाळणे हा एक न्यायाचा विषय (भांडण झाल्यावर कोर्टाने निवाडा करण्याचा विषय ) होतो. या गोष्टीचा निकाल करणे राजाचे काम आहे व राजाच्या अधिकारक्षेत्रांत असले निकाल करण्याचे काम समाविष्ट होते, व हा निकाल संघांनी पाळला पाहिजे असें नारद म्हणतात. निजधर्माविरोधेन यस्तु सामयिको भवेद् ॥ स तु यत्नेन संरक्ष्यो धर्मों राजकृतो मतः ॥ बृहस्पति अ०१७ आपल्या धर्माला बाध न आणतां जो कोणी इसम सामयिक त्या संघाचा समय पाळणारा सभासद होईल, त्याचे राजाने संरक्षण केले पाहिजे, कारण राजाला मान्य व राजाने ठरविलेला धर्म तो पाळतो: यासाठी अशा इसमाचें राजाने प्रयत्नपूर्वक संरक्षण करावें. तात्पर्य राजाने ठरविलेल्या धर्माला बाध न आणतां कोणालाहि या मंडळांचे सभासद होतां येई व त्याचे संरक्षण करणे राजाचे काम होते. यावरून राजाज्ञा मोडगारे हि संब त्याकाळी होते व त्या संघांना राजाच्या संरक्षणाचा फायदा मिळत नसे हे समजते. वणिजां कर्षकाणां च चोराणां शिल्पिनां तथा ॥ अनियम्यांशकर्तृणां सर्वेषामेष निर्णयः ॥ तेषां चेत्प्रसृतानां च ग्रहणं समवाप्नुयात् ॥ तन्मोक्षणार्थ यद्दत्तं वहेयुस्ते यथांशतः ॥ कात्यायन. - वर पेंढारी वगैरेंचे संघ असत असे सांगितले आहेच व अशा अधार्मिक संघांना राजाचे संरक्षण मागण्याचा हक्क नाही असें बृहस्पतीच्या वाक्यांतून आपण वर श्लेष काढला; पण त्याबाबद कात्यायनाने स्पष्टच खुलासा केला आहे तो असा. वाणी ( व्यापारासाठी ) शेतकरी ( शेती सुधारण्यासाठी), चोर (लुटालुटीसाठी), शिल्पी ( मोठे कारखाने भा...हिं...स्व...१६