पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० भावी हिंदी स्वराज्य [प्र० १५. भरणारा, (३) गण ( आयुधजीविवाहिकेषु ) लष्करांत राहून हत्यारांवर पोट भरणारा (४) श्रेणि ( वार्ताशास्त्रोपजीवी ) व्यापार वगैरेंवर पोट भरणारा असे भेद होते. कौटिल्याने यांचा उल्लेख केला आहे तो असा—(१) कांभोज, सुराष्ट्र, क्षत्रिय, श्रेण्यादयोवार्ताशास्त्रोपजीविनः । लिच्छिविक, वृजिक, मल्लक, मद्रक, कुकुर, कुरु, पांचालादयो राजशब्दोपजीविनः । कौटिल्य-११-१-१६०. क मी । नारदांच्या काळी या समूहांचे अनेक प्रकार होते. ते असे-- पाखंड, नैगम, श्रेणि, पूग, वात, गणादिषु॥ संरक्षेत्समयं राजा दुर्गे जानपदेषु च ॥ नारद अ० १० श्रेणिनैगम, पाखंडी, गणानामप्ययं क्रमः॥ भेदं चैषां नृपोरक्षेत्पूर्ववृत्तिं च पालयेत् ॥ याज्ञवल्क्य (व्य०) (१) पाखंड-हिंदु धर्मांची तत्वे न मानणाऱ्या लोकांचे समूह. 7 (२) नैगम-परदेशी व्यापारासाठी जाणाऱ्या लोकांचा तांडा. (३) श्रेणि-एक आचार विचार व धंदा पाळणाऱ्या लोकांचा जमाव, (४) पूग-भिन्न आचार विचार पाळून एक धंदा करणाऱ्या HP लोकांची टोळी.' माना कि (५) बात-लुटालूट करून शस्त्रांवर पोट भरणारे पेंढारी. ) (६) गण-देशाच्या हितासाठी एकजुटीने वागणारे लोक. या सर्व लोकांना आपल्या देशांत अगर गांवांत आपला समय Agreement ( करार ) पाळण्यास राजाने लावावे, यांची जूट विवक्षित कराराने होत असे, ह्या कराराला 'समय' म्हणत व हे समय राजमान्य व सर्व लोकसंमत होते व ते पाळणें राजदंडाच्या भयाने भाग पाडीत असत, असें नारदः स्मृतीवरून दिसते. याज्ञवल्क्यांनी पूर्वपरंपरा कायम ठेवून त्यांचे भेद (विशेष जे नियम असतील ते) पाळावे असे. सांगितले आहे. यावरून कांही सामान्य नीतितत्वे या संघांना आपल्या नियमांनी मोडतां येत नसत किंवा असली नीतितत्वे सोडून असलेले करार राजाला मान्य नसत असे दिसते. NETOS,