पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

STEPEETTISजानपत संस्था जानपद सस्था मिलीली गांव किंवा नगर यांचे पलीकडे राजकीय संस्थांची हिंदुस्थानांत प्राचीन काळी वाढ झालेली नव्हती. पण सामाजिक, औद्योगिक व धार्मिक बाबींत या प्रकारच्या म्हणजे एका नगरापेक्षा मोठ्या देशविभागाचा विचार करणान्या संस्था होत्या. पाणिनीच्या काळी सुद्धा अशा संस्था व त्यांबद्दलचे नियम वगैरे होते असें पाणिनीच्या खालील सूत्रांवरून दिसते. ; (१) संघे चानोत्तराधये । ३-३-४२ . .. . (२) संघोद्धौ गणप्रशंसयोः। ३-३-८६ पहिल्या सूत्राचा असा अर्थ आहे की, संघ (प्राण्यांचा समूह ) अशा अर्थी 'चि' घातूचे रूप करणे असेल तर वरचा व खालचा किंवा श्रेष्ठ व कनिष्ठ भाव ज्यांत नाही अशा समूहासाठी मात्र 'घञ्' प्रत्यय लागतो. यावरून माणसांचे संघ-शंत श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे असे संघत्यावेळी प्रचारांत होते. दुसऱ्या सूत्रांत तर 'संघ' हा शब्दच 'गण' (मोजून जेथे माणसांचे अनुक्रम लावलेले असतात ) अशा अर्थीच तयार होतो, एरवी हे रूप होत नाही असे स्पष्ट सांगितले आहे. यावरून 'गण' संस्था स्थापन झाल्यानंतर या संस्थांचे लढाईसाठी जाणारे प्रकार म्हणजे संघ (सम्यग् हन्यते येन ) असा शब्द रूढ झाला असे स्पष्ट आहे. याशिवाय पाणिनीची खालील सूत्रे त्यांचे प्रकार सांगतात. (१) पूगायोऽग्रामणीपूर्वात् । ५-३-११२ (२) बानच्फोरस्त्रियां । ५-३-११३ (३) आयुधजीविसंघाच्यडाहीकेष्वब्राह्मणराजन्याद् ॥५॥३॥११४ याप्रमाणे संघांचे (१) पूग (अर्थ काम प्रधानः) पैसे मिळविण्यासाठी झालेला (२) व्रात (उत्सेधजीवि) लुटालुटीने पोट