पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८० भावी हिंदी स्वराज्य पीक [प्र. १६ पाणी पुरवठा, रस्त्यांची जमीन, चोरवाटा व कोट व बुरूजांवरील पहारेकन्यांची तपासणी ही कामें नगराधिपतींनी रोज केली पाहिजेत. त्याचप्रमाणे नाहीसे झालेले, विसरलेलें व चुकलेलें (माणूस, जनावर, अगर जिन्नस) संभाळणे हे हि त्यांचे अवश्य कर्तव्य असे. त्यांनी दररोज अगर आठवड्यांतून एकदां दोनदां कैद्यांची तपासणी केली पाहिजे व ज्यांनी काम करून (सक्तमजूरी), कायदंडेन (मार वगैरे शिक्षा भोगून), हिरण्य (दंड वगैरे द्रव्य भरून), किंवा अनुग्रहण (मेहेरबानी संपादन करून (माफी मिळवून) आपली शिक्षा पुरी केली असेल त्यांस सोडून दिले पाहिजे. तात्पर्य, व्यवस्था व न्याय ही त्यांची प्रमुख कामें होती.