पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.]02] नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २३७ . या देवळांत प्राथमिक शिक्षण मिळे, उत्सव वगैरेंत सर्वजण भाग घेत व त्यामुळे स्वयंसेवकत्वाचे व जुटीने काम करण्याचे शिक्षण मिळे. उत्सवांत कारागिरीला उत्तेजन असे. देवळांत रोज सायंकाळी पुराण असून ते ऐकण्यास व देवदर्शन घेण्यास सर्व येत. पांथस्थ देवळांतच ओऱ्यांत उतरत व त्या ठिकाणी गांवकरी व पांथस्थ यांचे विचारविनिमय होत. तात्पर्य, देवळे म्हणजे एक प्रकारचे (क्लब) अड्डेच होते. गांवाची सर्व कामें येथे ठरत. सर्व चळवळींचें केंद्र येथे होते. सार्वजनिक निवडणुकी वगैरे देवळांतच देवासमोर ( देवामिद्विजसन्निधौ) होत. व्यवस्था-हीं सर्व कामें गांवाने निवडलेले लोक करीत. या कामांसाठी खर्चाची व्यवस्था खालीलप्रमाणे होती. १ प्रपा । गांवांतील धनिक लोक धर्म म्हणून ही कामें धर्मार्थ करीत. २ मंडप , यांना इष्टापूर्त धर्मक म्हणून सर्व स्मृतिकारांनी म्हटले आहे. गांवाच्या जरूरीची ती इष्ट व गांवाला पूर्णत्व देणारी ती पूर्त. ३ आपण-शुल्क जकातीवर याचा खर्च भागे, ४ राजवरालय-दंडाच्या उत्पन्नांतून याचा खर्च चाले. ५ सर्वजनवास । यासाठी घरपट्टी होती. बाहेर जसा जमीनीवर ६ रक्षक सारा तशी गांवांत ही पट्टी समजत. ७ स्मशान-केरकचरा वगैरेच्या उत्पन्नांत याचा खर्च भागे, ८ वनोपवन-शिकणाऱ्या मुलांच्या आईबापाच्या व राजाच्या देणगीवर या संस्था चालत. शिवाय पोटापुरतें धान्य वगैरे उत्पन्न करणे (शेती) व भिक्षा यांचा यांना पाठिंबा होता. देवालय-धार्मिक वर्गणी व देणग्यांचे उत्पन्न यांतून यांचा खर्च चाले. नगराधिपतींची कामें खालील होती. नित्यं उदकस्थानं, मार्गभूमिः, छन्नपथ, वप्रप्राकाररक्षोवेक्षणं नष्टप्रस्मृतापसृतानां च रक्षणं । दिवसे पंचरात्रे वा बंधनस्थान विशोधयेत् । कर्मणा कायदंडेन हिरण्यानुग्रहेण वा ॥ कौटिल्य २-३६-५६