पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ भावी हिंदी स्वराज्य गम, [प्र० १४ संगोपन होईल व ही 'शाखा नगरें' म्हाताऱ्यांची गांवें या नांवानें अनेक प्रकारे आदर्शभूत होतील, कोणाही इसमाने चैन, अनीति वगर गोष्टी तेथे आणूं नयेत असा निबंध पाहिजे. 'विनीतवेषेणैव प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम'. (९) देवालय-प्रत्येक पेठेत एक एका देवाचे प्रमुख देवालय असे व ही देवालये त्या त्या वस्तोच्या अनुरोधाने ठरलेली असत. ती अशी(१) अपराजित, अप्रतिहत, जयंत, वैजयंत कोष्ठकान् शिववैश्रवण, अश्वि, श्रीमदिरागृहं च पुरमध्ये कारयेत् ।। कौटिल्य । २-४-२२ (२) इंद्रश्च वासुदेवो गुहो जयंतश्च वैश्रवणः॥ आश्विन्यौश्रीमदिरे शिवश्च दुर्गासरस्वती चेति ॥ मयमत । अ०१० (३) पूर्वादि दिक्षुक्रमशः स्थिताः स्युः। तथार्यमश्चापि पुनर्विवस्वान् ॥ मित्रश्च पश्चाच्च महीधराख्यः। ब्रम्हाच मध्यस्थचतुष्पदस्थः। कौटिल्य (कश्यप) यांच्या मताने शिव, वैश्रवण (कुबेर) अश्विनी कुमार व श्री (लक्ष्मी) यांची पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तरेस; मदिरादेवीचें गांवामध्ये व अपराजित, अप्रतिहत, जयंत व वैजयंत यांची आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य व ईशान्य भागांत देवळे असावीं. २ मयांच्या मताप्रमाणे नगराचे अक्रा भाग करून त्यांत इंद्र, वासुदेव, गुह कार्तीकस्वामी, जयंत, वैश्रवण, अश्विनीकुमार, श्री, मदिरा, शिव, दुर्गा व सरस्वती यांची देवळे असावी. ३ भृगूंच्या मताप्रमाणे पूर्वेस अर्यमा, दक्षिणेस विवस्वान्, पश्चिमेस मित्र व उत्तरेस महीधर यांची देवळे असून मध्ये ब्रह्मदेवाचे देऊळ असावें. उपदिशांचे ठिकाणी शर्व, स्कंद, जत्रक, व पिलिपिंझक hi यांची देवळे असावीं व वेशीच्या बाहेर चरकी, विदारी, पूतना व पाप राक्षसी यांची देवळे असावी.