पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २३५ र मसणवटी उत्तरेस अगर पूर्वेस असून तींत उंच वर्ण उत्तरेस व हलके दक्षिणेस अशी व्यवस्था असावी पाखंडी व चांडाल हे लोक स्मशानाजवळ वसवावे. प्रत्येक घराला शौचकूप नैऋत्येस पण सबंध गांवाची घाण ईशान्येस अशी व्यवस्था हिंदी शास्त्रकारांना मान्य आहे. (८) वनोपवन गोशाला दक्षिणतश्चोत्तरदेशे च पुष्पवाटी स्यात्॥ पूर्वद्वारोपांते पश्चिमतस्तापसावासं ॥ सर्वत्रैव जलाशयमिष्टं वापी च कूपं च ॥ मयमत । अ० ९ वने वा नगरोपांते नागरैश्चजनैर्वृतं ॥ क्षेत्रारामाकरोपेतं शाखानगरमिष्यते ॥ शिल्परत्न, भृगु. ५ मयांच्या मताप्रमाणे गांवची गाईंची खिल्लारे दक्षिणेस असून पूर्वेच्या वेशीजवळ उत्तरेकडे बागा असाव्या व पश्चिमेस तपश्चर्या करणारे ब्राह्मण व त्यांच्या शाळा असाव्या. गांवांत तळी, विहीरी वगैरे पाण्याची साधने जागोजाग असावी. भृगूंच्या मताप्रमाणे नगराच्या पश्चिमेस नगरापासून लांब अगर जवळ शेती, बागा, खाणी यांनी युक्त असें 'शाखा नगर' असावे व त्यांत शिक्षण संस्था असाव्या. शिक्षणसंस्था नगराच्या बाहेर लांब वनांत व त्यांत शेती वगैरे करण्यासाठी शेजारचा (उप) भाग (वन) अशी व्यवस्था होती. या वनांशी नागरिकांचा नेहमी संबंध असे. (१) लहानपणी स्वतः तेथे शिकणारे शिष्य म्हणून. (२) मोठेपणी आपली मुले तेथे आहेत म्हणून. (३) म्हातारपणीं संसाराचा कंटाळा आला म्हणून, व यामुळे वनांत जाणे त्यावेळी कठीण वाटत नसे. हल्लीसुद्धां हल्लीच्या परिस्थितीप्रमाणे शाळा व कालेजें नगराबाहेर नगरापासून लांब ठेवली व पेनशन घेतलेले वगैरे वृद्ध तेथे राहू लागले तर या जागांना थोरवी येईल, विद्यार्थ्यांना म्हाताऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा मिळेल, तरुण लोक सल्लामसलतीसाठी तेथे येतील, म्हातारे आपला जन्माचा व्यासंग तेथे पुढे चालवितील व याप्रमाणे या जागा म्हणजे ज्ञानाची केंद्रस्थानेच बनतील. श्रीमंतांच्या चैनी बंद झाल्या म्हणजे त्या बचतींत गरीबांचे