पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ ___ भावी हिंदी स्वराज्य विधान [प्र० १४ (७) स्मशान-स्मशान म्हणजे नुसती प्रेतं जाळण्याची किंवा पुरण्याचीच जागा नव्हे तर गांवांतील घाण वगैरे टाकण्याचीहि जागा होय. प्रागुत्तरदिशि दंडैः पंचशतैः स्याच्छवावासं॥ शेषाणामपि तत्र दूरे देशे स्मशानं स्याद् । माया चांडालचर्मकारस्मशानतोयाशयापयानं स्यात् ॥मयमत अ०९ गांवाच्या ईशान्येस पांचशे दंड अंतरावर प्रेतें पुरणे अगर जाळण्याची जागा असावी व गांवांतील कचऱ्यासाठी गांवापासून पुष्कळ अंतरावर एक स्मशान ( डेपो) असावा. चांडाल ( भंगी), चर्मकार ( ढोर) व स्मशान (घाणीचे सांठे) हे पाण्याच्या सांठ्यापासून लांब असावे. न चांडालयोषितस्तास्ताम्रायःसीसभूषणाः सर्वाः॥ पूर्वाह्ने मलमोक्षक्रियोचिता ग्राममावेश्याः॥ मयमत। अ०९ . भंग्यांच्या बायकांच्या अंगावर तांबें व शिसे यांचे दागिने असावे व त्यांना गांव साफ करण्याकरतां सकाळी गांवांत येऊ द्याव्या. बाकी त्यांनी गांवापासून दूर रहावें. चांडालकुटीराणि पूर्वायां क्रोशमात्रे स्युः॥ मयमत। अ०९ _भंग्यांच्या झोपड्या गावापासून कोसभर दूर पूर्वेकडे असाव्या असे मयाचे मत आहे. याबाबद भृगूचे व कश्यपाचे मत थोडे भिन्न आहे, तें असें--- (१) क्रोशद्वये वातस्यार्धे बहिश्चांडालपक्कणं॥ प्रागुत्तरेण च क्रोशाद्वहिः पितृवनं भवेत् ॥ नदीसमीपे शैलेवा स्मशानं दूरतो भवेद् ॥ भृगुसंहिता, (२) उत्तरः पूर्वो वा स्मशानवाटः। दक्षिणेन वर्णोत्तराणां । पाषंडचांडालानां स्मशानांतेवासः । कौटिल्य २-४-२३ । ईशान्येकडे कोस दोनकोसांवर मसणवटी व चांडालांची वस्ती असावी. ही जागा गांवापेक्षा उंच असू नये.