पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.]027 नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २३३ mo, शस्त्रं द्विजातिभिग्राह्य धर्मो यत्रोपरुध्यते ॥ मानक (0) द्विजातीनां च वर्णानां विप्लवे कालकारिते ॥ THE आत्मनश्च परित्राणे, दक्षिणानां च संगरे॥ीणा स्त्रीविप्राभ्युपपत्तौ च नन् धर्मेण न दुष्यति ॥ मनु । अ० ८ ज्यावेळी धर्माला ( समाजव्यवस्थेला) बाध येतो तेव्हां ती नीट ठेवण्यासाठी सर्व नैवर्णिकांनी हत्यारे हाती घ्यावी. फक्त ब्राह्मण व क्षत्रिय हे दोनच वर्ण धंद्यापासून व व्यवहारापासून अलिप्त ठेवण्यांत आल्यामुळे जरी त्रैवर्णिकांना परवानगी असली तरी दोनच वर्णाना वाटेल त्या वेळी शस्त्रग्रहण शक्य होते. आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, परदेशाशीं लढतांना (मनु उत्तरेकडचा म्हणून तो दक्षिणेला परदेश म्हणतो व मराठेशाहीत उत्तर हिंदुस्थान परदेश समजला जाई व त्या लोकांना 'परदेशी' हे नांव दक्षिणेत अद्याप रूढ आहे) बायका व ब्राह्मण यांचा छळ होईल तर वाटेल त्याने हत्यार घेऊन प्रतिकार करावा, अशी व्यवस्था मनूने सांगितली आहे. कर म्हणजे रक्षणाचा विमा उतरल्याची वार्षिक फी ( हप्ता) असे तेव्हां समजत व चोरीस गेलेले द्रव्य राजाला भरून द्यावे लागे. (१) चोरहुतं अविद्यमानं द्रव्यं स्वद्रव्येभ्यः प्रयच्छेत् । कौटिल्य. (२) अरक्षितारं राजानं बलिषड्भागहारिणं ॥ तमाहुः सर्व लोकस्य समग्रमलहारकं ॥ मनु । अ० ८ चोरांनी द्रव्य नेले तर तें राजाने भरून द्यावे व तो तसे न करील तर सगळ्या लोकांत त्याची बेअब्रू होईल. हे पगारी रक्षक वेशीवर व नाक्यांवर जागोजाग उभे असत. 1 नगरे नगरे चैकं कुर्यात्सर्वार्थचिंतकं ॥ मनु । अ०७ - प्रत्येक नगरांत सर्व रक्षकांचा एक प्रमुख असावा व त्याने नेहमी शहरांत काय चालले आहे हे लक्षपूर्वक पहात असावे व वाईट होत असेल त्याचा प्रतिकार करावा.