पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ या भावी हिंदी स्वराज्य प्रशाशक [प्र० १४ : (३) प्रधानकारवश्च क्षत्रियाश्च पूर्वी दिशामधिवसेयुः। असार) वैश्याश्च दक्षिणां दिशां, शूद्राः पश्चिमां, ब्राम्हणाश्चोत्तरां दिशं । कौटिल्य । अ० २२ आमा (४) वैश्यानां वणिजां प्राच्यां मध्ये राजापणो भवेत् ॥ प्रागुदीच्यां कुलालानां वापकानां च तत्रहि ॥ जालिकानां तु वायव्ये सनानां पश्चिमे गृहं ॥ तैलविक्रयिणां सौम्ये तक्षणां वाप्यनिले नले ॥ शिल्परत्न अ०५ विस्तवाशी कामे करणारे लोक ( लोणारी, लोहार, भट्ट्यावाले ) हे एका ठिकाणी बसवावे. मयांच्या मताप्रमाणे वैश्य ( वाणी) दक्षिणेस, शूद्र सभोवार, पूर्व किंवा उत्तरेस कुंभार, मासे मारणारे कोळी वायव्येस, मांस विकणारे पश्चिमेस वगैरे रचना असावी. कौटिल्य ( कश्यप ) यांचे मताप्रमाणे उत्तरेस ब्राम्हण, पूर्वेस क्षत्रिय, दक्षिणेस वैश्य व पश्चिमेस शूद्रांची वस्ती असावी. शिल्परत्नकार ( भृगू ) यांच्या मताप्रमाणे पूर्वस वैश्य, इशान्येस कुंभार व वापक ( मासे मारणारे ) जालिक वायव्येस, सून ( मांस विक्रयी) पश्चिमेस, तेली उत्तरेस व आग्नेय किंवा वायव्येस सुतार वगैरेची वस्ती असावी. याप्रमाणे देशपरत्वें नगररचना निराळ्या प्रकारे होती. याप्रमाणे जातवार व धंदेवार पेठा असून पेठावार नगर प्रणिधि ( सभासद ) निवडीत असत. दर एक पेठेत एक एक देऊळ व ते सर्व घरांपेक्षा उंच असावे लागे, देवागारान्नराणामतिशुभदमिदं किंचिद्रनं समं वा ।। तस्मादभ्युन्नतं वा द्वितलविधिरपि नेष्यते तत्समीपे ॥ देवळाशेजारी ठेंगणी घरे असून कोणास उंच घर करणे तर त्याने पहिल्याने देऊळ उंच करावे व मग घर उंच करावें. पेठेतील घरांच्या स्थितीवरून पेठेतील लोक व धंदे यांची सुस्थिति समजून येत होती. (६) रक्षक-नगरांचे रक्षण करण्याचे काम नगरांतील लोक करीत. त्यांत क्षत्रिय हे पगारी नोकर असून ब्राह्मण हे स्वयंसैनिक होते. या ब्राह्मण स्वयंसैनिकांना केव्हां बोलावावे याबाबद मनूनें खालील नियम सांगितला आहे.