पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] , नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २३१ (पाणवठे), देवगृह (देऊळ), राजपरिग्रह (कचेऱ्या वगैरे) या ठिकाणी शौच केल्यास एक रुपया व लघ्वी केल्यास आठ आणे दंड, रोगी, औषध व भीति यामुळे शौच अगर लघ्वी झाली तर माफ. प्रेते वगैरे घाण स्मशानाशिवाय इतरत्र ठेवली अगर प्रेत भलत्याच ठिकाणी जाळलें तर बारा रुपये दंड, गवत खाऊन उंट, म्हशी वगैरे गेली तर चार आणे दंड (जातां जातां खालं तर), खाऊन बसली तर आठ आणे व तेथेच राहिली (वस्तीस) तर रुपया दंड, पेरलेले धान्य खाल्ले तर किती नुकसान झाले याचा अंदाज करून त्याच्या दुप्पट भरून देववावे. मोठ्या रस्त्यावर पाऊस पडत असेल तेव्हां मात्र पन्हाळी पडाव्या. एरवी घरांतून पाणी वगैरे रस्त्यावर पडेल तर बारा रुपये दंड; वगैरे शिक्षा कौटिल्य इत्यादि शास्त्रकारांनी सांगिल्या आहेत. याबाबद मनुस्मृतीत खालील श्लोक आहेत. न मूत्रं पाथ कुर्वीत । नाप्सु मूत्रं पुरीषं वा ष्टीवनं वा समुत्सृजेत् ॥ दूरादावस्थान्मूत्रं दुरात्पादावसेचनं ।। उच्छिष्टान्नविषेकं च दूरादेव समाचरेत् ॥ मनुस्मृति ।अ०४ तसेच पंचांसंबंधाने खालील धर्मसूत्र पहा___कर्षकपशुपालवणिकुकुसीदकारवः स्वेस्वर्गे । धर्मसूत्र. शेतकरी, धनगर, वाणी, सावकार व कारागीर यांचा न्याय त्यांच्याच घुढे व्हावा (५) सर्वजनवास. गांवांतील पेठांत कोणती वस्ती कोठे असावी याबद्दल निर्बध होते. ते नमुन्यासाठी खाली दिले आहेत. (१) अग्निजीविनः एकस्थाने वासयेद् । कौटिल्य. (२) वैश्यानां दक्षिणतः परितः सदनं तु शूद्राणां ॥ प्राच्यां वाप्युत्तरतो गेहं कुर्यात्कुलालानां ॥ मत्स्योपजीविनां स्याद्वासो वायव्यदेशेच ॥ पश्चिमदेशे मांसैरुपवृत्तीनां निवासः स्यात् ॥ मयमत अ० १०