पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० मा भावी हिंदी स्वराज्य विमाफ [प्र० १४ आंत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या मालावर जकात, ती जकात आंतील असो अगर बाहेरील असो माल आल्यावेळी दिली पाहिजे. आंत येणाऱ्या मालावर किंमतीचा पांचवा हिस्सा जकात घ्यावी. ही दारावर घ्यावयाची जकात मेहरबानी म्हणून किंवा दुसऱ्याशी आपला जसा संबंध असेल तशी कमीजास्त ठेवावी. - क्रयविक्रयमध्वानं भक्तं च सपरिव्ययं ॥ योगक्षेमं च संप्रेक्ष्य वणिजो दापयेत्करान् ॥ मनु । ७।१२७. खरेदी, विक्री, वहातूक, व्याज, नोकर वगैरे खर्च व जिन्नस मिळविण्यास व संभाळण्यास पडलेला त्रास या गोष्टी विचारात घेऊन जकात ठेवावी असा परिपाठ होता व परदेशाशी जकात जशास तशी ठेवीत, "पण्यानांस्थापयेत् शुल्कं अत्ययं चापकारतः" हा त्या काळचा नियम होता. (४) राजवरालय-नगरांतील व्यवस्थेसंबंधाने खालील प्रकारचे नियम अंमलांत होते व त्या नियमांबाबद चौकशी पंचांमार्फत होई. (१) पांसुन्यासे रथ्यायामष्टभागो दंडः पंकोदकसन्निरोधे पादः। (२) पुण्यस्थान उदक स्थान देवगृह राजपरिग्रहेषु पणोत्तरा विष्टा दंडाः । मूत्रेष्वर्धदंडाः । भैषज्यव्याधिभयानमित्तं अदंडयाः। (३) स्मशानादन्यत्र (प्रेतादीनां) न्यासे दहने च द्वादशपणो दंडः। (४) विनीतं भक्षयित्वा अवसृतानां उष्ट्रमहिषाणां पादिकं रूपं गृण्हीयुः । भक्षयित्वा निषण्णानां द्विगुणः परिवसतां चतुर्गुणः। (५) सस्यभक्षणे सस्योपघातं निष्पत्तितः परिसंख्याय द्विगुणं दापयेत् । (६) प्रणालीमोक्षो ( रथ्यायां ) वर्षति ( देवे ) अन्यथाद्वादश पणोदंडः। मोठ्या रस्त्यावर कचरा टाकला तर दोन आणे दंड, पाणी आडून चिखल झाला तर चार आणे, पवित्र जागा ( समाघि वगैरे), उदकस्थान