पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें] 27 नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २२९ (मुख्य रस्ते, टंकरोड) असे प्रकार होते. व या रस्त्यांच्या बाजूला काय असावे म्हणजे दुकानें कोणच्या रस्त्यांवर, श्रीमंत लोकांची घरे कोणत्या रस्त्यांवर, नाटके वगैरेंच्या जागा कोणच्या रस्त्यांवर, वेश्यांची दुकानें कोणच्या रस्त्यांवर हे ठरविलेले असे, मंगल, रथ्या व महापथ या रस्त्यांवर दुकानें (किरकोळ जिनसांची दुकाने ) घालण्याची बंदी होती. रेशमी कापड, सोने, चांदी, जवाहीर वगैरेंचा मात्र या रस्यांवर व्यापार चाले. (३) आपण-नगराच्या प्रमुख भागांत एक एक आपण (मार्केट) असे. त्या ठिकाणी अमक्या दिशेला व अमक्या भागांत अमुकच जिनसांचा व्यापार चालावा असे ठरलेले असें. गांव किंवा बाजार यांच्या सभोवार जो रस्ता असे त्याला प्रदक्षिणा किंवा ब्रम्हावृत पथ म्हणत व त्यांतील व्यवस्थेचा नमुना खाली दिला आहे. यांत देशपरत्वे थोडा फार भेद आहे. महेंद्राद्यन्यंत भक्ष्यं भोज्यं च निर्दिष्टं ॥ अग्न्यादिपितृगृहपर्यंतं तत्र भांडानि ॥ तस्मान्नितिपदांतं कंसादिकमत्र विज्ञेयं ॥ 7 स्यात्पुष्पदंतभागांतं पितृभागादि वस्त्रादि॥ मयमत। अ०१० - पूर्वेपासूत आग्नेयीपर्यंत खाण्यापिण्याच्या जिनसा, आग्नेयीपासून दक्षिणेपर्यंत भांडी, दक्षिणेपासून नैऋत्येपर्यंत धातू किंवा वस्त्रे वगैरे याप्रमाणे बाजाराची रचना असे. बाजारांत वजनें, मापें व माल यांची तपासणी दर सहा महिन्यांत तरी एकदां करीत. तुला मानं प्रतीमानं । सर्वच स्यात्सुलक्षितं ॥ षटसु षद्सु च मासेषु । पुनरेव परीक्षयेद् ॥ मनु । अ०८ याच आपणखात्याकडे शुल्क (जकाती) यांची व्यवस्था असे. आंत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही मालांवर जकात घेत व ती रोजची रोज चुकवावी लागे. निष्क्राम्यं प्रवेश्यं च शुल्कं । बाह्यमाभ्यंतरं च आतिथ्यं । जा द्वारादेयं शुल्कपंचभागं आनुग्राहिकं वा यथादेशोपकारं स्थापयेत् । प्रवेश्यानां मूल्यपंचभागः । कौटिल्य. २॥२२॥