पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बैं. नगराधिपत्य MUNICIPAL BODIES २२७ ना(अ) स्वतःचे कर व त्यांची व्यवस्था स्वतः करण्याचा अधिकार असणे. . (आ) हा अधिकार चालविण्यापुरती संपत्ति मिळविता येईल अशी व्यापार वगैरेमुळे सांपत्तिक स्थिति असणे. (इ) शत्रु वगैरेपासून संरक्षण करण्याची शक्ति असणे. ही तीन का नगरपणा येण्यास अवश्य अशी साधने होत. वर जे नगराचे मुख्य नऊ भाग सांगितले त्यांचे सामान्य स्वरूप सांगन मग त्याबाबद कशी व्यवस्था ठेवीत हे आपण पाहं.. . (१) प्रपा. त्या वेळी बहुधा घरोघर विहिरी असत. " आधी जल व मग स्थल ” अशी आपली म्हण आहे. पण जेथें घरोघर विहिरी असणे शक्य नसे, जेथे गोरगरीबांना विहिरी पाडणे शक्य नाही तेथे दरएक मोहल्यांत एक हौद बांधण्यांत येई. या हौदाचा आकार त्या आळीतील लोकसंख्येवरून ठरवीत असत. ब्राह्मण माणसाला नऊ घागरी पाणी, क्षत्रियाला सात, वैश्याला पांच, शूद्राला तीन व अंत्यजाला एक याप्रमाणे माणशी पाण्याचा हिशोब करून याप्रमाणे हौदाचे माप ठेवण्यास शिल्पशास्त्रकारांनी सांगितले आहे. सांडपाण्याची व्यवस्था 'प्रपा' या खात्याकडेच असे. ही सांडपाण्याची गटारें 'मुकुलाकार' म्हणजे खाली चिवळ व वर रुंद अशी असून ती माणूस आंतून जाईल इतकी तरी मोठी ठेवीत असत. मोठ्या शहरांत भांडवाहिनीः कुल्याः कारयेत् । आंतून नावा जातील येवढी मोठी गटारे ठेवण्यास सांगितले असून प्रत्येक घरवाल्याने आपल्या घराचे सांडपाणी रस्त्यांतील मोठ्या गटारास मिळविले पाहिजे, नाही तर त्यास दंड असे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रांत नमूद केले आहे. ते असेंमात्रिपदीप्रतिक्रांतं अत्यर्ध अरत्नी वा प्रवेश्य गाढप्रसृतं .. उदकमार्गप्रस्रवणं प्रघातं वा कारयेत् । ३-८-६१