पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१४ भृगू होते तेथे व्यापारावर भर असून लोकसत्तापद्धति रूढ होती असे अनुमान काढण्यास हरकत नाही. तर २ कश्यपांनी नगरांत विस्तीर्णपणा व मोठे वाडे यांवर भर दिला असून शोभेकडे पाहिले आहे. यांतहि प्रपा (पाणीपुरवठा ) मंडप (धर्मशाळा ), आपण (बाजार ) वगैरे व्यापारी बाबींना प्रमुखपणा दिलेला आहेच, पण त्या ठिकाणी कर वगैरे बसविण्याच्या सत्तेचा उल्लेख नाही. यामुळे या नगरांत. राजसत्ता नांदत असण्याचा दुष्कळ संभव आहे. मोठी लोकसंख्या, मोठा विस्तार व रस्ते वगैरे व्यापारास लागणाऱ्या सोई इतक्या गोष्टी असल्या म्हणजे ती जागा कश्यपांच्या मताप्रमाणे नगर झाली. ( ३ ) मयांच्या मताप्रमाणे न्याय देण्याचे काम होणे, सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असणे व आपले स्वतःचे संरक्षण करतां येणें या तीन गोष्टींवरच भर दिला आहे. यांत स्वतःचे संरक्षण करणे व न्याय देणे या गोष्टी भांडखोरपणा व्यक्त करीत असून लोकसत्तेशी संबंध दाखवितात. (४) चौथ्या व्याख्येत नगराची नऊ प्रमुख खातींच सांगितली आहेत. ती अशी- T RIPPIYA १ प्रपा-प्रकामंपीयते अस्यां-पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. २ मंडप-मंडपानि-धर्मशाळा, विश्रांतीची जागा, विसांवा. ३ आपण-प्रकामं पणयति-देवघेव करण्याची जागा, बाजार. ४ राजवरालय-न्यायाच्या कचेऱ्या, राजाच्या प्रतिनिधींची बैठक. ५ सर्वजनवास-सगळ्यांची वस्तीची जागा, पेठवस्ती. ६ रक्षक- पहारेकरी, चौकीदार. ७ स्मशान-निरुपयोगी जिनसा टाकण्याची जागा, मसणवट, ८ देवालय-देवाची जागा, धार्मिक गोष्टी करण्याचे स्थान. ९ वनोपवन-वनांत विचार व उपवनांत आचार यांचे शिक्षण, तात्पर्य, या नऊहि गोष्टी जेथील लोकांना मुखत्यारीने व स्वतंत्रपणे करतां येतात तें नगर. या चार व्याख्यांवरून आपणांस लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे- काका