पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण चौदावें कामयत नाका नगराधिपत्य MUNICIPAL BODIES - मागील प्रकरणांत आपल्या शरीरापासून तो थेट अखिल विश्वापर्यंत एकावर एक राजसंस्थांच्या कशा पायऱ्या आहेत हे आपण पाहिले. दहापांच माणसें म्हणजे एक कुटुंब, दहापांच कुटुंबे म्हणजे एक आळी अगर वाडी, दहापांच आळ्या म्हणजे एक पेंठ किंवा गांव व दहापांच गांवे म्हणजे एक नगर हे कोष्ट कहि तेथे दिले आहे. नगराची व्याख्या शिल्पशास्त्रकारांनी खालीलप्रमाणे केली आहे. - (१) नगराणि करवर्जितानि यंत्रसाराणां निगमवणिजांच स्थानानि । भृगुसंहिता. (२) विस्तीर्णमध्यो नगरः सममध्य चतुष्पथः॥ प्रपामंडपापणादिवनोपवनशोभितः॥ कश्यपसंहिता, (३) नगरं राजवरालयसर्व जनावासरक्षकैः सहितं । मयमत. (४) नवांगं नगरं प्राहुः कामात सोय . या चार व्याख्यांत नगरांचे चार प्रमुख गुण सांगितले आहेत ते असे. (१) ज्या जमीनीच्या भागावर राजाकडून कर घेतले जात नाहीत व जो भाग कारखानदार व अंडत्ये यांनी वसलेला असतो त्या भागाला नगर म्हणावे. या व्याख्येत स्थानिक स्वराज्याची अगर लोकांनी आपल्या कामासाठी आपणच कर बसवून घेण्याची कल्पना प्रमुख असून हे लोक म्हणजे मोठमोठे कारखानदार व व्यापारी असावे असे सांगितले आहे. इनामदार, संस्थानिक वगैरे लोक आपल्या कामासाठी आपल्यावर कर बसवून घेतील पण तसले क्षेत्र नगर नव्हे हे यांत उघड केले आहे. तात्पर्य जेथे मोठा व्यापार चालतो व जेथील लोक स्वतःची व्यवस्था स्वतः करतात तें नगर अशा दोन अटी या व्याख्येत आहेत. यावरून ज्या मुलुखांत भा...हिं...स्व...१५