पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १३ प्रतिनिधित्वाला नालायक समजावयाचा. जो स्वतःचे कल्याण अकल्याण पाहू शकत नाही तो दुसऱ्याचे कसे पाहणार हे उघडच आहे. 'सप्तव्यसनवर्जितः ' सात व्यसनांपासून अलिप्त असेल तो मनुष्य भला मनुष्य म्हणावा. तात्पर्य, ज्याच्या हाती लोकांनी आपली सर्व सत्ता ठेव म्हणून द्यावयाची तो इसम चांगला, तशाच योग्यतेचा पाहिजे. कोणी तरी केवळ मतदार होण्यास लायक असा इसम प्रतिनिधि होण्यास लायक समजणे, त्याने भिकाऱ्याप्रमाणे दारोदार मतांची भीक मागत फिरणे, सूक्तासूक्त वाटेल त्या रीतीने मते मिळविणे, त्यासाठी वाटेल ती वचने देणे वगैरे दोष हल्लीच्या निवडणुकीच्या पद्धतीत आहेत. आपण सर्व चांगले वाईट सारख्या योग्यतेचे अशी भलतीच समजूत सर्व मतदारांची झाल्यामुळे हल्लीच्या प्रातिीनधिक संस्थांचे समाजसत्तेत (सोशिआलिझम, बोल्शेविझम वगैरे) रूपांतर होते. हे दोष आपल्या पूर्वजांनी मोठ्या चातुर्याने घालावले होते. अनेक स्वाऱ्या, लढाया, आपसांतील द्वेष वगैरेंमुळे त्या संस्था मोडकळीस येऊन मोडल्या, ही गोष्ट निराळी, पण त्यांची रचना नमुनेदार असून ग्रीक संस्थानांनी ती त्या काळी उचलली ते योग्यच केले. पुढे सुद्धा आपण तीच पद्धति स्वीकारली पाहिजे तरच आपले कल्याण होणार आहे.