पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामपंचायती २२३ तो खर्च झाला पाहिजे. परस्पर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असें होतां कामा नये, She repE S 76 ४ विद्या-गांवपंचायतीत काम करणाऱ्या प्रतिनिधींना पत्रे लिहिणे व वाचणे, जमाखर्व व हिशोब, देशाची परिस्थिति व राज्यव्यवस्था, व लोकांच्या चालीरीती व धर्म यांची माहिती पाहिजे, प्राथमिक मोफत व सक्तीच्या शिक्षणांत खालील गोष्टी अवश्य शिकविल्या पाहिजेत. १ व्यवहार-यासाठी व्यवहारदर्पण म्हणून पुस्तक करावें...... २ नीति-यासाठी नीतिपाठ म्हणून पुस्तक पाहिजे. ३ धर्म-यासाठी धर्मरचना नांवाचे पुस्तक करवावे. ४ व्यापार-व्यापारी माहिती देणारे व्यापारी पुस्तक पाहिजे. ____५ राष्ट्रकार्य-राज्यव्यवस्थेची माहिती देणारे पुस्तक पाहिजे. इतक्या गोष्टी प्रत्येक मुलाच्या कानावरून गेलेल्या पाहिजेत व या गोष्टींचे ज्ञान असलेलाच इसम प्रतिनिधि होण्यास लायक होय. याशिवाय शिक्षणावर देखरेख ठेवणारी माणसे निदान मराठी शिक्षण पुरे केलेली पाहिजेत. - ५ आचरण हे प्रत्येक प्रतिनिधीचे अत्यंत महत्त्वाचे अंग होय, प्रतिनिधि निवडावयाचा तो सदाचरणी पाहिजे. निदान तो सप्तव्यसनांकित नसावा. मृगया द्यूतं स्त्रियाः पानमिति चतुर्वर्गः कामजः । वाक्पारुष्यं अर्थदूषणं दंडपारुष्यमिति त्रिवर्गः कोपजः। शिकार, जुगार, रांडबाजी व कैफ ही चार व शिवीगाळ, चोरी, (हाताळपणा) व मारामारी ही तीन अशी सात व्यसनें प्रतिनिधींना असतां उपयोगी नाहीत. या सात व्यसनांच्या आधीन असणारा इसम प्रतिनिधि होण्यास नालायक होय. व्यस्यति एनं श्रेयसः तद्व्यसनं । जे श्रेयस्कर काय याचा विचार करावयाला सवड देत नाही व एकदम काम करवितें तें व्यसन अशी व्यसनाची व्याख्या केली आहे व असा इसम या व्यसनामुळे अयोग्य कर्म करण्याचा संभव असतो म्हणून तो