पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१३ शिवाय माणूस प्रतिनिधि निवडावयाचा म्हणजे त्याची लायकी ओळखतां आली पाहिजे. त्याचा उच्छृखलपणा जाऊन त्यास स्थिर गंभीरपणा आला पाहिजे, त्याचा पोरकटपणाव उतावीळपणा जाऊन त्याच्या ठिकाणी दमदारपणा आला पाहिजे व या गोष्टींची परीक्षा त्याच्या वर्तनावरून करता आली पाहिजे. यासाठी प्रतिनिधींचे वय पस्तीस वर्षाचे पाहिजे. इतक्या वयांत त्याच्या मागील वर्तनावरून त्याच्या पुढील वर्तनाचे धोरण जाणतां येतें. मत देणारा कसाहि असला तरी काम करणारा पोक्त पारखलेला पाहिजे. त्याचे दिमतीस तरुण मनुष्य असला तर चालेल, यासाठी प्रतिनिधि पोक्त व त्यांचे चिटणीस तरुण असावे. प्रतिनिधींच्या अंगांत विशिष्ट धमक व ताकद पाहिजे म्हणून सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचा प्रतिनिधि नसावा. तात्पर्य, कोणाहि प्रतिनिधीचे वय पस्तीसापेक्षा कमी अगर सत्तरापेक्षा जास्त असू नये. २ बंधु-प्रतिनिधि होण्याला लायक अशा दोन तरी इसमांनी प्रतिनिधीची शिफारस केली पाहिजे. मतदार तरुण अननुभवी असतात. सबब त्यांची शिफारस या ठिकाणी ग्राह्य नाही. यानंतर मते घेतल्यावर ज्यांना ज्यास्त मते मिळतील ते इसम निवडून येतील. गांवांतील सहा कामें या पंचायतीकडे सोपवावयाची आहेत. सबब दरएक गांवांत निदान सहा प्रतिनिधी निवडले पाहिजेत व एकंदर तीस सभासद निवडले म्हणजे पुरे. यासाठी दर चाळीस माणसांस एक किंवा स्थूलमानाने शेकडा दोन इसम याप्रमाणे प्रनिनिधि होण्यास लायक इसम निवडावे व या निवडलेल्या लोकांपैकी गांवच्या कामाला लागत असतील तितके प्रतिनिधी मतदारांनी पसंत करावे. जास्त बंधू असलेले असेच लोक शेवटी निवडून येणार पण पहिल्याने प्रत्येक उमेदवाराला दोन तरी बंधू पाहिजेत, ३ वित्त-आपले स्वतःचे पोट भरतां येईल इतकी तरी मिळकत प्रतिनिधीची हवी. यासाठी वर्षाकाठी तीन रुपये शेतसारा अगर घरभाडे व काही तरी गांवपट्टी भरणारा हा इसम असला पाहिजे. ज्याचे पैसे त्याच्या मताने खर्च झाले पाहिजेत, यासाठी जो इसम गांवपट्टी भरतो तो प्रतिनिधि होण्याला लायक. गांवचे सुखदुःख गांवांतील सर्व लोकांनी पहावें हे योग्य. पण त्यासाठी खर्च होणारा पैसा जे देतात. त्यांच्या मताने