पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामपंचायती ... २२१ कर्षकवणिकपशुपालकुसीदिकारवः स्वे स्वे वगै। तेभ्यो यथाधिकारमर्थान्प्रत्यवहृत्य धर्मव्यवस्था । धर्मसूत्राणि स्ववर्गेध्यवरा धर्मान्प्रब्रूयुः। विशेषतः शेतकरी, व्यापारी, धनगर, सराफ व कारागीर यांचे त्यांच्या व्यवहारांचे रिवाज सर्वांना ठाऊक नसतात म्हणून यांच्या भांडणांत हेच पंच हवेत. हे पंच निदान तीन असावेत. या पंचांचा सल्ला घेऊन न्याय करणारांनी निवाडा द्यावा, व या निवाड्याची गांवकामगारांनी बजावणी करवावी. या निवाड्यावर जिल्ह्याचे ठिकाणी फेरतपासणी होईल व त्यांवर (देश) राजधानीच्या ठिकाणी तक्रार चालेल. यांशिवाय आपल्या गांवांत अमुक गोष्टीची उणीव अगर अडचण आहे असे दिसले तर कोणा धार्मिक व संपन्न इसमाच्या किंवा सरकारच्या मदतीने ती उणीव दूर होण्यासाठी खटपट गांवपंचांनीच करावयाची असते. भिक्षुक लोक ब्रह्मदंड घेत असतात, व्यापारी लोक धर्मादाय रक्कम काढीत असतात, शुभ प्रसंग, उत्सव वगैरेंत भूयसी व अशुभ प्रसंगी धर्मपिंड काढण्याचा प्रघात आहे, या दानधर्माच्या रकमांतून विहिरी, धर्मशाळा, वाचनालये, आजाऱ्यांसाठी रुग्णालये, वगैरे अनाथसुखसंवर्धक कामे करावी व अशी झालेली कामें दुरुस्त व चालू ठेवावा. याप्रमाणे रयतेवर कोणत्याहि प्रकारे मोठा बोजा न पाडतां व सर्वांच्या मदतीने गांवांतील सर्व कामांची व्यवस्था पंचांनी ठेवावी व पंच जो निर्णय देतील तो सर्वांनी मानला पाहिजे असा कायदा हवा. गांव काम राजाचे नोकर व लोकांचे प्रतिनिधी यांच्या मताने चालले पाहिजे व प्रतिनिधी सांगतील त्याप्रमाणे कामगारांनी केले पाहिजे, . ग्रामपंचायतीकडे कोणती कामें सोपविण्यांत यावीत हे. वर सांगितले आहेच, ही कामे चांगल्या रीतीने करता येतील इतके गुणसंपन्न प्रतिनिधी पाहिजेत, यासाठी ते गुण कोणते याचा तपशीलवार विचार करूं, १ वय प्रतिनिधींना कामें प्रत्यक्ष करून घ्यावयाची असतात, त्या साठी ते व्यवहार जाणणारे पोक्त पाहिजेत. प्रत्यक्ष कामांत नुसता तात्त्विक विवार उपयोगी पडत नाही. हातून काही तरी व्यवहार झालेला पाहिजे ।