पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १३ ( १ ) गांवांतील पिण्याच्या पाण्यांची व्यवस्था... .... . (२) गांवांतील स्वच्छता व आरोग्य यांची व्यवस्था. (३) गांवांतील मुलांच्या शिक्षणाची. व्यवस्था. . (४) गांवांतील रस्ते व बाजाराची व्यवस्था. ( ५ ) गांवांतीलं तंटे, भांडणांचा निकाल करण्याची व्यवस्था. (६) गांवांत सुधारणा व्हावी म्हणून कराव्या लागणाऱ्या गोष्टी. हाँ सर्व कामे करण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीसाठी प्रत्येक मतदाराने एक दिवस काम करावें अगर एक दिवसाची मजुरी द्यावी व निवाह होऊन उरणाऱ्या उत्पन्नावर पंचाईत ठरवील तो कर द्यावा. कर्मिणो मासिमासि एकैकमहः कर्म कुर्युः । नौचक्रीवंतश्च । भक्तं तेभ्यो दद्यात् । पशुहिरण्यादीनां पंचाशद्भागः। धर्मसत्राणि । अ० १० शिक्षण हे सार्वत्रिक व सक्तीने घ्यावयाचे आहे यासाठी त्याला लागणारा खर्च सर्वांनी दिला पाहिजे म्हणून थोडी घरपट्टी घराच्या योग्यतेप्रमाणे घ्यावी व या उत्पन्नांत जरूर ती भर वरिष्ट सभांनी घालावी. पाणीपुरवठा व रस्ते सर्वोपयोगी आहेत, व त्यासाठी दरएक मतदाराने अगमेहनत करण्याची सोय केलीच आहे. गांवांतील स्वच्छता प्रत्येक इसमाने व कुटुंबाने ठेवावी व ही तशी ठेवण्यांत येते अगर कसे हे पहाण्याचे काम लोकांनी अंगमेहनतीने फुकट करावयाचे व जे कोणी तसे करणार नाहीत त्यांस शिक्षा करून ते करावयास लावावयाचे, या दंडाच्या रकमेचा खर्च गोरगरीबांस औषधपाणी देण्याकडे करावयाचा. ज्यांनी रोग उत्पन्न करावे त्यांनीच त्यांच्या प्रतिकाराचा खर्च द्यावा हे वाजवीच आहे. गांवांतील तंटे भांडणांचा निकाल पंचांनी फुकट द्यावा. फक्त या तंटेभांडणाचे दप्तर संभाळणे व लिहिणे वगैरेचा खर्च भांडखोर लोकांनी द्यावा, यासाठी भांडण जितके लांबेल तितका त्यावर खर्च जास्त बसेल असे करावे. तसेच हमेश भांडणाऱ्या इसमापासून जास्त खर्च घेण्यांत यावा. उदाहरणार्थ पहिल्या फिर्यादीला खर्च कमी व पुढे दरएक फिर्यादीस जास्त जास्त वाढता खर्च पडावा. न्याय देणाऱ्या पंचाखेरीज भांडणारांच्या जातीचे, धंद्याचे वगैरे लोक पंच असावे