पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ग्रामपंचायती २१९ विद्या-ज्याला लिहिता वाचतां येते तो या मतदारांत पुरेसा विद्यासंपन्न समजावा. विद्येची व्याख्या भृगूनी- जमा यद्यत्स्याद्वाचिकं सम्यकर्म विद्येति संशितं ॥ अशी केली आहे. कोणते तरी काम चांगले करतां येत असावे व त्याची माहिती तोंडाने सांगतां येत असावी म्हणजे ती विद्या होय. सक्तीचे प्राथमिक शिक्षण घेऊन प्रत्येक इसम साक्षर व्हावा म्हणून ही लिहिणे वाचणे येण्याची अट मतदारांना ठेवणे इष्ट आहे. मुक्या माणसाला तोंडाने सांगतां न आले तरी लिहून दाखविता येईल; व आशा माणसांचा सुद्धा या लिहिण्यावाचण्याच्या योगाने विद्यासंपन्न माणसांत समावेश करतां येईल. आचार्याचा इतक्या पुरता दाखला पाहिज.. __आचरण-मतदाराचे आचरण समाजविध्वंसक असू नये. समाजाचा घात करणारा इसम मतदारीला नालायक होय. समाजाची सुव्यवस्था ठेवण्याच्या कामासाठी माणसांची निवड करण्यास मते द्यावयाची तेव्हां समाजाविध्वंसक माणसें या कामों उघडच नालायक ठरतात. समाजाने बहिष्कृत माणसे देखील, तशीच समाजबंधने न मानणारी म्हणून, नालायक समजावी. सारांश, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गांवांतील प्रत्येक इसमाला खालील अटींवर मत देण्याचा अधिकार असावा. (१) सोळा वर्षांच्या वर त्याचे वय असावें. (२) व्यवहार त्याला समजत असावा. (३) त्याला उपजीविकेचे भिक्षेशिवाय साधन असावें । (४) त्याला बोलतां व लिहितांवाचतां येत असावें. (५) तो समाजविध्वंसक अगर बहिष्कृत नसावा.. . इतक्या गोष्टी अनुकूल असल्या म्हणजे प्रत्येक माणसाला मत देण्याचा अधिकार असावा. याला सार्वत्रिक मतदान किंवा 'युनिव्हर्सल सफ्रेज' म्हणतात. या मतदारांकडून बहुमताने निवडून आलेल्या लोकांनी त्या गांवांतील सर्व सार्वजनिक कामें पहावी. ही सार्वजनिक कामें म्हणजे गांवांतील सर्व लोकांचे हितसंबंध असणारी खालील कामे:- -