पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लें.] संघस्थापना करण्याची पद्धति यांचा विस्तार करता येईल. सर्व वर्तमानपत्रांनी एका राजकारणालाच स्वतःला वाहून घेण्याऐवजी असल्या एक एक बाबीचा विचार करणारे एक एक पत्र व त्या पत्राला त्या बाबीची चर्चा करणारे व माहिती पुरविणारे संघ स्थापन झाले तर त्या बाबीची कितीतरी उपयुक्त चर्चा होण्यासारखी आहे. अशा रीतीने समाजांतील सर्व माणसांना कोणत्या ना कोणत्या तरी उपयुक्त संघांत काम करता येईल व याप्रमाणे एकदां संघाने कामें करण्याची संवय लागली, गोडी उत्पन्न झाली, कामें करण्याची पद्धत समजली, त्या पद्धतीने कामें करण्यांत होस वाटू लागली म्हणजे हे ज्ञान वाटेल त्या संघशक्तीने करावयाच्या कामाकडे लावता येईल. एकदां बॉयलरमध्ये वाफ तयार झाली व त्या वाफेने चालणारे यंत्र तयार असले म्हणजे वाटेल ते काम त्या वाफेच्या यंत्राने जसे करता येते त्याचप्रमाणे एकदां संघाचे सभासद झाले, त्यांत काम करण्याची पद्धत अंगवळणी पडली म्हणजे वाटेल ते काम संघशक्तीने करता येते, हीच गोष्ट आपल्याला हिंदुस्थानांत लावावयाची आहे. भजन, कीर्तन, गायन, फोनो यांचाहि प्रसिद्धि करण्याकडे उपयोग करता येईल; तसेंच मेळे काढूनहि त्या बाबीत जनतेत जागृति करता येईल. याशिवाय या बाबींचे शिक्षण शाळा, विद्यालये, विद्यापीठे यांत त्या विषयांवरील पुस्तकें व व्याख्याने यांचे मार्फत शिक्षकांनी अगर बाहेरच्या इतर लोकांनी देण्याचा उपक्रम करावा. लहानपणापासून मुलांना त्या त्या विषयाची मूलतत्वे शिकविली व शास्त्रीय ज्ञान झाले तर त्याचा फारच चांगला उपयोग प्रौढपणी होणार आहे. याप्रमाणे कोणत्याहि बाबींत संघाने काय केले, कोठपर्यंत मजल गांठली यावरून त्या संघाचे काम करणाऱ्या लोकांचा उत्साह व कळकळ किती आहे, त्या संघांच्या पुढाऱ्यांची पुढारी होण्याची योग्यता किती आहे याचीहि कसोटीच आहे. अशा त-हेने सर्व बाजूने एखाद्या गोष्टीबद्दल उचल करणे यालाच त्या गोष्टीचा व्यावहारिक उपक्रम म्हणावे. वर्षांतून केव्हांतरी एक दिवस त्या विषयाचा विचार करण्याचे प्रदर्शन किंवा हळदकुंकू करणे म्हणजे त्या विषयाचा संघ स्थापणे नव्हे. हे प्रदर्शन म्हणजे संघाची भातुकलीसारखी नकल होय. संघ म्हटला की त्या संघाच्या कामाला सर्वस्वी वाहून घेतलेली चार तरी माणसें हवीत