पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य प्र० १ स्थानांत उत्पन्न करण्यास व हिंदुस्थान देशाची सर्व बाजूने भरभराट होण्यास उपयोगी पडणार आहे. या पद्धतीची मुख्य अंगें म्हणजे सार्वजनिक सभा व पटांगणावरील व्याख्याने होत, या कामी वर्तमानपत्रांवर तीन प्रकारची जबाबदारी असते. (१) या संस्थांच्या कामांचे अहवाल प्रसिद्ध करणे, (२) या संस्थांची रचना व घटक व याची माहिती देणे व (३) या संस्थांच्या गुणदोषाचे विवरण करून लोकांचे लक्ष या संस्थांकडे वेधणे, ज्या वेळी वर्तमानपत्रे पक्षांध झालेली नसतात तेव्हां तो आपले हे कर्तव्य चांगल्या रीतीने करून देशाचे कल्याण करतात; कारण या प्रकाराने लोकांचं लक्ष त्या संस्थांकडे लागते, त्या संस्थांना त्यांचे दोष व उणीवा दिसतात व त्यांना मदत मिळन ते दोष घालविण्यास त्यांस मदत होते. याशिवाय संस्थेच्या प्रसिद्धीकरणाचे मार्ग म्हणजे जाहिराती, मासिक वृत्ते, लहान पुस्तकें, हस्तपत्रके, भिंती वगैरेवर लावण्याचे जाहिरनामे, वगैरे होत. हिंदुस्थानांत या गोष्टी अद्याप प्रचारांत यावयाच्या आहेत, कारण सामुदायिक घटना असलेल्या सार्वजनिक संस्था हिंदुस्थानांत फार कमी आहेत. हिंदुस्थानांत म्युनिसिपालिट्या व लोकल बोडें आज तीस चाळीस वर्षे तरी आहेत. पण या स्थानिक संस्थांच्या कामांच्या अडचणी, त्यांच्या कामांची चर्चा, त्यांच्या गुणदोषांचे विवेचन वगैरेबद्दल उहापोह करणारे एकसुद्धां वृत्तपत्र नाही. प्रत्येक गांवांत व जिल्ह्यांत या संस्थांच्या कामाची रड खाजगी रीतीने ऐकू येते पण सार्वजनिक रीतीने या कामाची चर्चा कोणी करीत नाही. या संस्थांच्या कामाची चर्चा करणारी जर एखादी संस्था निघाली तर किती तरी गोष्टीचे ज्ञान जनतेंत पसरेल, नवीन किती तरी अनुभवांची माहिती उपलब्ध होईल, पुढे होणारे किती तरी अनर्थ टळतील. स्थानिक स्वराज्य या नांवाचे एक दैनिक चालवावयाचे म्हटले तरी चालेल इतकी या बाबीची माहिती जनतेपुढे मांडण्यासारखी आहे. याच बाबींत सिनेमाचाहि उपयोग करता येण्यासारखा असून स्थानिक स्वराज्यावर एक दोन सुंदर नाटकेहि करतां येतील. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य हे एक उदाहरणादाखल घेतले आहे. व्यापार, उद्योग, धंदे, शिक्षण, धर्म, इतकेच नव्हे तर समाईक भांडवलाच्या कंपन्या, भाजीपाल्याची शेती, गवळ्याचा धंदा असल्या फुटकळ विषयापर्यंत या संघांचे कार्यक्षेत्र व काम