पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ भावी हिंदी स्वराज्य [प्र. १३ तात्पर्य, सोळा किंवा अठरा वर्षे वय झालेल्या प्रत्येक माणसास मत देण्याचा अधिकार आहे मग तो स्त्री असो वा पुरुष असो. बंधु-कोणाहि माणसाची कोणत्याहि कामी निवड करावयाची म्हणजे त्याला दोन तरी बधू पाहिजेत. एक पुरस्कर्ता किंवा प्रपोझर व दुसरा अनुमंता किंवा सेकंडर. करार वगैरे कागदावर दोन साक्षीदार लागतात याचे तरी कारण हेच, आतां गांवपंचायतीच्या मतदारांना असे कोणते बंधु पाहिजेत ? या मतदारांत तर साधारणपणे सर्व लोकांचा समावेश व्हाबयाला पाहिजे. यासाठी श्रुतींत- गाना मातृमान् पितृमान् आचार्यवान् पुरुषो वेद । असे वाक्य आहे. आई ही कामपुरुषार्थाचा गुरु, बाप हा अर्थपुरुषार्थाचा गुरु व आचार्य हा धर्मपुरुषार्थाचा गुरु होय. यांपैकी आचार्याचा आधार विद्येच्या विचारांत येईल, म्हणून बंधूमध्ये आई व बाप यांची गणना केली पाहिजे. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलाला शिकविण्याचे काम आईचे व त्यांत त्याला पुरेसे ज्ञान आहे असा तिने दाखला दिला पाहिजे. पैसा, वगैरे व्यवहार शिकविण्याचे काम बापाचे व त्याबद्दल त्याचा दाखला पाहिजे. तात्पर्य, खाणेपिणे व पैसा अडका हे व्यवहार ज्याला समजतात त्याला हे दोन बंधु आहेत असे समजावें. ज्याला आपण वेडा म्हणतो, तो मनुष्य मतदार होण्यास नालायक असें या विवेचनावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल. वरच्या संस्थांतील मतदारांना जास्त जास्त बंधु किंवा अनुयायी यांचा पाठिंबा पाहिजे हे सांगितले पाहिजे असें नाहीं. वित्त-प्रत्येक मतदाराच्या मालकीचे काही तरी व्यवहारोपयोगी द्रव्य किंवा पोटाला मिळविण्याचे साधन पाहिजे, ज्याची उपजीविका केवळ भिक्षेवर व ज्याला दुसऱ्या कशाची जरूर नाही असा विरक्त किंवा पशुतुल्य मनुष्य मतदार होण्यास नालायक समजावा. भीक मागून निर्वाह करणारे सर्व लोक याप्रमाणे मतदार होण्यास नालायक होत. याखेरीज बाकी गांवांत राहणारे सर्व लोक ग्रामपंचायतीसाठी प्रतिनिधी निवडण्यांत मते देण्यास लायक होत.