पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें. ] ] ग्रामपंचायती २१७ - - - असलेल्या माणसांकडे राहील. तात्पर्य, न्यायनिवाडा देण्याचे काम एका वर्गाकडे, अंमलबजावणी करण्याचे दुसऱ्याकडे असावें. नी । वित्तबंधुकर्मजांतिविद्यावयांसि मान्यानि । परबलीयांसि । श्रुतं तु सर्वेभ्यो गरियः । अ. २० ते २३ तदपेक्षस्तद्धतिः । अ ८७ वयोबंधुश्च वित्तं च विद्याचान्वरणं तथा ॥ एतानि मान्यस्थानानि गरीयो यद्यदुत्तरं ॥ भृगुसंहिता वय म्हणजे जन्मकालापासून लोटलेला काळ, बंधु म्हणजे आपल्या मदतीला येणारे इसम, वित्त म्हणजे आपल्या ताब्यात असलेली संपत्ति विद्या म्हणजे आपण मिळविलेले ज्ञान व आचरण म्हणजे आपली वागण्याची त-हा या पांच गोष्टींवर माणसाची योग्यता अवलंबून असते व या पांचांत पुढच्या पेक्षां अगोदरचे गण कमी दर्जाचे होत. यासाठी कोणाहि माणसाची योग्यता मोजावयाची म्हणजे या पांच गोष्टींनी मोजावयाची व अमुक गूण पाहिजेत म्हणून सांगावयाचे म्हणजे या पांचांचें माप सांगावयाचे. यासाठी खाली दिलेल्या व्यवस्थेत या पांचांचाच निर्देश केला आहे. नवय-द्वादशवर्षा स्त्री प्राप्तव्यवहारा भवति षोडशवर्षः पुमान् . मुलगी बारा वर्षांची झाली म्हणजे ती सज्ञान समजावी व मुलगा सोळा वर्षांचा झाला म्हणजे तो सज्ञान समजावा असे सूत्र आहे. पण सोळा वर्षांचे वय झाले तरी उपनयन करण्याइतकी अक्कल जर नसली तर फक्त ब्राम्हण जातीचा मुलगा मात्र व्रात्य (निरुपयोगी ) ठरतो. क्षत्रिय व वैश्य या वर्गांना जास्त वर्षांची यत्ता ठरविली आहे व ज्याअर्थी आपणांस या तिन्ही वर्गाना मताचा अधिकार देणे आहे त्याअर्थी मतदाराच्या वयाची यत्ता सोळापासून चोवीस वर्षांपर्यंत ठेवली पाहिजे. चोवीस वर्षाचे वय झाले तरी जर कोणी इ.सम माणुसकीला योग्य इतका ज्ञानवान झाला नाही तर तो मतदारीला मुकला. हल्लीच्या कायद्याने अठरा वर्षे वयाच्या माणसाला सज्ञान समजले जाते व ही यत्ता सोळापर्यंत नेतां येईल.