पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १३ राजा जसा देशाला एक तसा राजप्रतिनिधि राजाने नेमलेला एक इसम असणार, पण प्रजा पुष्कळ असल्याने त्यांचे प्रतिनिधी अनेक असतात सबब त्यांच्या समुदायांना निरनिराळी नांवे ठेवावी लागतात व ती खालीलप्रमाणे ठरवून ठेवावी. जाति-वंशपरंपरेनें जन्मावरून जी ठरविण्यात येते ती. कल-आचारावरून ज्याचा निर्णय करण्यांत येतो तें. वर्ग--धंद्यावरून ठरणारा तो. संघ-आपण होऊन जे सार्वजनिक काम पत्करलें तो. समिति-विविक्षित काम करण्यासाठी निवडलेल्या मंडळींची. मंडल—ज्या समितीला गांवोगांव फिरावे लागते तें. सदस-लोकांना शिक्षण देण्याकरतां बोलावलेली मंडळी ती. परिषद्-सामान्य विचारांचा विनिमय करण्यासाठी बोलाविलेली ती. सभा–कार्याकार्य ठरविण्यासाठी निवडक लोकांची भरविलेली ती. सत्र-कायदे वगैरे सार्वदोशक काम करणारी मंडळी ती. हल्ली मतदारांचे जे गुण तेच उमेदवारांचे आहेत. पण व्यवहारांत दोघांचे काम फार निराळे आहे. मतदारांनी कामांची सामान्य दिशा ठरवावयाची असून उमेदवारांनी त्या धोरणाने कामें प्रत्यक्ष घडवून आणावयाची असतात. यासाठी मतदारापेक्षा उमेदवाराची योग्यता पुष्कळ जास्त पाहिजे, राज्यकारभाराचे व्यवहार करणाऱ्या मंडळींची व्यवहाराचे क्षेत्राप्रमाणे एकाहून एक चढते असे वगे लागतात. व यासाठी एका क्षेत्रांतील उमेदवार ते दुसऱ्याच्या क्षेत्राचे मतदार असें केलें व ग्रामपंचाइतींत सर्व लोकांना मताचा अधिकार ठेवला म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत सारखी योग्य परंपरा व चढत्या गुणांमुळे काम करण्याची योग्य लायकी यांची सोय होईल. प्रजेने निवडलेल्या लोकांनी कामाची दिशा ठरवून ते कसे करावे हे ठरवावें व राजाने निवडलेल्या इसमांनी त्याप्रमाणे अंमल . बजावणी करावी. असे केले म्हणजे राजा व प्रजा या दोघांचाहि कामांत योग्य मिलाफ राहील, पैसे (कर) यांची सर्व मंजुरी प्रजाप्रतिनिधीकडे राहील व अंमलबजावणी करण्याचे काम राजाच्या अधिकाऱ्यांकडे राहील व न्यायनिवाडा देण्याचे काम राजा व प्रजा या दोघांचा विश्वास