पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ मावी हिंदी स्वराज्य आ [प्र० १२ कार्यक्षम व्हाव्या म्हणून पहिल्याने अनेक संघ स्थापून आपणांस त्यांचा पाया घातला पाहिजे. शेतकऱ्यांचा संघ, व्यापाऱ्यांचा संघ, विद्यार्थ्यांचा संघ, पदवीधरांचा संघ, म्युनिसिपल मतदारांचा संघ, रेलवे प्रवाशांचा संघ, कौन्सिल मतदारांचा संघ, जहागीरदारांचा संघ, तालुकदारांचा संघ, जमीनदारांचा संघ, सरकारी नोकरांचा संघ असे संघ स्थापून फुकट व प्रामाणिकपणे कामे करण्याची संवय उत्पन्न केली पाहिजे. साधी रहाणी ठेवून क्लेश हौसेने सोसण्याची शक्ति उत्पन्न केली पाहिजे, अनेक व्रते, उपवास, वगैरे करून कंटकपणा आणला पाहिजे. मरणाची भीति नाहींशी केली पाहिजे म्हणजे आपण प्रातिनिधिक संस्थांमार्फत स्वराज्य मिळवू शकू. एकी व कष्ट सोसणे हे दोन गुण आपणांस पहिल्याने पाहिजे आहेत व हे ब्राम्हण व क्षत्रिय यांनी आणले पाहिजेत.