पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था २ सभापतीने धर्म म्हणजे लोकांची व्यवस्था नीट रहावी म्हणून सुद्धां लोक ज्या विरुद्ध ओरड करतात असें काम करूं नये, लोक गैरसमजामुळे किंवा अज्ञानामुळे सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल गैरशिस्त किंवा व्यर्थ गिल्ला करीत असतील तरी सुद्धा असली गोष्ट चांगली किंवा हितकर असली तरी करूं नये, तात्पर्य, बहुजनसमाजाला न रुचणारी गोष्ट सभापतीने केव्हांहि करू नये. ३ सभापतीने करूं नये असे वर सांगितल्याप्रमाणे काम केले तर शहाण्या लोकांनी समजून सांगावे किंवा वर सांगितल्याप्रमाणे चांगली गोष्ट करावयाची आहे पण तिच्याविरुद्ध लोकमत आहे तर लोकांना शहाण्या लोकांमार्फत त्या गोष्टीचे फायदे वगैरे नीट समजावून द्यावे व त्यांचे मत बदलवून मग ती करावी. तात्पर्य, गोष्ट व लोकांचा गिल्ला यांपैकी ज्याचा बदल करता येईल त्याचा बदल करून एकवाक्यतेने जें करणे ते करावें. लोकांचे मत तरी बदलावे किंवा आपले कायदे किंवा काम करण्याची पद्धत तरी बदलावी. तात्पर्य, लोकांना नाखुष करून कांहीं करूं नये. __याप्रमाणे प्राचीन काळी मुसलमानांचा हिंदुस्थानांत प्रवेश होईपर्यंत व्यवस्था होती. दर गांवांत पंचायत, शहरांत नगराधिपत्य व राज्यांत राजसभा यांची प्रातिनिधिक व्यवस्था होती. आडदांड मुसलमानांशी संबंध आल्याने ही पद्धत सार्वजनिक कामांत मोडली व फक्त जातिव्यवहारापुरती राहिली. नुक याच झालेल्या जर्मन युद्धांत सुद्धा जर्मन सरकारच्या एकतंत्री राज्यपद्धतीशी टक्कर देण्यासाठी इंग्लंद, फ्रान्स वगैरे देशांना सुद्धां तात्पुरती आपली सत्ता एकमुखी करावी लागली, व अशीच स्थिति हिंदुस्थानाप्रमाणे पांचचारशे वर्षे टिकेल तर त्यांच्यात सुद्धा प्रजासत्ता मोडून जाईल. ग्रीस, रोम वगैरे प्रजासत्तक राज्यांची ही अवस्था झालेली आपण पहातोच. तरी हिंदुस्थानची सामाजिक व्यवस्था चांगली आहे म्हणून मुसलमानीत सुद्धा जीव धरून योग्य परीस्थिति येतांच मराठे, शीख, रजपूत वगैरे आपली स्वराज्य स्थापू शकले. आतां इंग्रजी राज्यांत फिरून आपणास आपल्या प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याची अवश्यकता उत्पन्न झाली आहे. या प्रातिनिधिक संस्था