पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२. भावी हिंदी स्वराज्य ना [प्र० १२ मतभेद, महत्त्वाचे नाहीत म्हणून मतांचा भिन्नपणा जाऊन एकवाक्यता झाली. त्या ठिकाणी शेवटी झालेली एकवाक्यता अखंड किंवा निर्भेळ नव्हे. पण एकवाक्यता आहे म्हणून ही सल्ला मध्यम, हिच्यांत दोष नाहीत असें नाही पण केवळ किरकोळ दोष, तपशिलांत दोष म्हणून ही सल्ला घेण्यास हरकत नाही. कालाका ३ ज्या बाबींत एके काळी भांडणे व निंदा होत होती, जीत धर्माचे म्हणणे निराळे, अर्थाचे म्हणणे निराळे, जेथे बायका, पोरें, म्हातारे वगैरेपैकी कोणी किंवा सर्व जण रडतात, व दया उत्पन्न करून मत फिरविण्यास सांगतात, एक रागावून उठून जातो अशी स्थिति असते तो सल्ला वाईट, या निकालांत दोष असतात इतकेच नव्हे तर धर्म, अर्थ, दया, न्याय, अशा सद्गुणांचे भिन्न मत असल्यामुळे ते दोष खरे व शास्त्रसिद्ध असतात. तो सल्ला घेण्यास योग्यच नव्हे, व्यवहारासाठी काही तरी केलेच पाहिजे म्हणून असा सल्ला कदाचित् घेऊन काही तरी करणे भाग असेल. पण नाइलाज म्हणूनच ती घ्यावयाची. एक म्हणतो माझी धमासाठी याला हरकत, दुसरा म्हणतो माझी याला अर्थासाठी हरकत, तिसरा म्हणतो दयेसाठी माझी हरकत, चौथा म्हणतो न्यायासाठी माझी हरकत, असला सल्ला ग्राह्य नव्हे ; सदोष हे लक्षात ठेवून नाइलाज म्हणून ती पत्करावयाची तर पत्करावी पण दोष डोळ्यापुढे असू द्यावे. सभापतीने काय करावें या बाबीवर खालील नियम पहा. १ न कंचिदूनं मन्येत सर्वस्य शृणुयान्मतं ॥ का बालस्याप्यर्थवद्वाक्यमुपयुंजीत पंडितः ॥१॥ २ धर्ममपि लोकविकृष्टं न कुर्यात्। ३ करोति चेदाशासयेदेनं बुद्धिमद्भिः। . १ सभापतीने कोणालाहि कमी महत्त्वाचा असे समजू नये. त्याने सर्वांचे म्हणणे सारख्या आस्थेने व मोकळ्या मनाने ऐकून घ्यावे. ज्याच्यांत मतलब किंवा ग्राह्यांश आहे असले भाषण लहान पोराने केले तरी शहाण्या माणसाने त्याचा उपयोग करून घेण्यास चुकू नये. तात्पर्य शहाण्याने मधमाशांप्रमाणे जेथे जे घेण्यासारखे सांपडेल ते बेलाशक घेत जावें. SE